Mumbai: विक्रोळीतील SRA प्रकल्पाच्या ठिकाणी 42 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला; दोन वर्षातील दुसरी घटना (Watch Video)
2022 मध्ये याच तलावात 19 वर्षीय सुमित जांबळे याचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र नंतर तो खून असल्याचे निष्पन्न झाले. या हत्येप्रकरणी गौरव शेलार (20) याला अटक करण्यात आली आहे.
Mumbai: विक्रोळी (Vikhroli) पूर्व भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) इमारतीच्या तळघरात एका 42 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली आहे. 2022 मध्ये त्याच ठिकाणी एका 19 वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे आढळून आले होते. खरेदीदारांना फसवण्याच्या आरोपाखाली बिल्डरला अटक करण्यात आल्याने येथील बांधकाम बऱ्याच दिवसांपासून ठप्प झाले आहे. दरम्यान, आता प्रकल्पाची जागा गुन्हेगारी कारवायांसाठी प्रसिद्ध ठरत आहे. प्राप्त माहितीनुसार, 15 फेब्रुवारीच्या संध्याकाळी, स्विमिंग पूलसाठी खोदलेल्या मोकळ्या खड्ड्यात मृतदेह तरंगत असल्याचे पाहून स्थानिकांनी पोलिसांना खबर दिली. दुर्लक्ष केल्यामुळे, बांधकामाचा भंगार आणि बिअरच्या बाटल्यांनी भरलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे, असे पोलिसांनी सांगितले. विक्रोळी पूर्व येथील रहिवासी राजू माणिक येनकप्पा अशी या मृतदेहाची ओळख पटली असून तो अनेकदा दारू पिण्यासाठी घटनास्थळी जात असे.
मद्यधुंद येनकप्पा तलावात घसरून बुडाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, अहवाल येणे बाकी असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर हिरडेकर यांनी शनिवारी सांगितले. (हेही वाचा - Bhopal Shocker: व्हॅलेंटाईन डेला प्रेयसीला घरी आणण्यास दिला नकार; संतापलेल्या मुलाने आईची गळा दाबून केली हत्या, आरोपीला अटक)
2022 मध्ये याच ठिकाणी सापडला होता 19 वर्षीय तरुणाचा मृतदेह -
2022 मध्ये याच तलावात 19 वर्षीय सुमित जांबळे याचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र नंतर तो खून असल्याचे निष्पन्न झाले. या हत्येप्रकरणी गौरव शेलार (20) याला अटक करण्यात आली आहे. फ्री प्रेस जर्नलशी बोलताना लारेना रेसिडेन्सी फ्लॅट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष युसेबियस डी'क्रूझ यांनी सांगितले की, पुनर्विकासाचे कंत्राट एसएसव्ही बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे हेमंत पारीख यांना देण्यात आले होते. तथापि, SRA ने ते 2017-18 पर्यंत संपुष्टात आणले. त्यानंतर टागोर नगर येथील विक्रोळी प्रकल्पात फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने 150 खरेदीदारांची फसवणूक करून 30 कोटी रुपये घेतल्याप्रकरणी बिल्डरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. तीन वर्षांहून अधिक काळ फरार राहिल्यानंतर, 2021 मध्ये पारीख यांना आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अटक केली. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. (हेही वाचा -Wife Murder Husband: दारूच्या व्यसनाला कंटाळून पतीची निद्रावस्थेत निर्घृण हत्या, आरोपी पत्नी स्वत: पोलिस ठाण्यात हजर)
तथापी, येथील परिस्थिती पाहता अनेक वर्षांपासून इमारतीचे काम रखडलेले दिसत आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, दिवे किंवा सीसीटीव्ही नसल्यामुळे ते समाजकंटकांचे सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. यामुळे स्थानिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप डिक्रूझ यांनी केला आहे. रहिवाशांनी एसआरए आणि महारेराकडे आपली व्यथा मांडली असून कोर्टातही धाव घेतली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)