Junnar Shocker: जुन्नरमधील 1200 फूट दरीच्या पायथ्याशी आढळला 40 वर्षीय पुरूष आणि महाविद्यालयीन मुलीचा मृतदेह, पोलिसांकडून शोध सुरू
यात श्रीगोंदा तालुक्यातील 40 वर्षीय सरकारी अधिकारी रामचंद्र साहेबराव पारधी आणि आंबोली गावातील 22 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी रूपाली संतोष खुटान यांचा समावेश आहे. पोलिसांना ही दुहेरी आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
Junnar Shocker: जुन्नर (Junnar) तालुक्यातून मोठी घटना समोर आली आहे. दुर्गावाडी गावातील कोकण कड्याजवळील 1200 फूट खोल दरीच्या पायथ्याशी दोन मृतदेह आढळले. मृतांची ओळख पटली आहे. यात श्रीगोंदा तालुक्यातील 40 वर्षीय सरकारी अधिकारी रामचंद्र साहेबराव पारधी आणि आंबोली गावातील 22 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी रूपाली संतोष खुटान यांचा समावेश आहे. पोलिसांना ही दुहेरी आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. जुन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचार यांनी या शोधाची पुष्टी केली.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक रहिवाशांना कोकण कडा जवळ अनेक दिवसांपासून एक पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याचे दिसले. गावकरी कारजवळ गेले तेव्हा त्यांना तिथे एक पुरुष आणि महिलांच्या पादत्राणे आढळली. त्यानंतर यासंदर्भात स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. (हेही वाचा - Sangli Father Killed Daughter: धक्कादायक! NEET सराव परीक्षेत कमी गुण; मुख्याध्यापक बापाच्या मारहाणीमुळे मुलीचा मृत्यू)
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोधकार्य सुरू केले. रविवारी, दाट धुके, पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य तात्पुरते थांबवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी, 23 जून रोजी बचावकार्य पुन्हा सुरू झाले. जीव धोक्यात घालून, पोलिस आणि बचाव पथकांनी उंच दरीत शोधमोहिम राबवून अखेर दोन्ही मृतदेह शोधून काढले. (हेही वाचा, Atpadi News: आटपाडी हादरली, जिम चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार)
दरम्यान, पोलिसांनी ही सामूहिक आत्महत्या असावी, असा संशय व्यक्त केला आहे. परंतु, याबाबत नेमका तपशील अद्याप अस्पष्ट आहेत. दोघांमध्ये कोणत्या प्रकारचे नाते होते किंवा ही दुर्घटना कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणामुळे परिसरातील लोकांनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तथापी, पोलिस या संपूर्ण प्रकाराचा शोध घेत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2025 01:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

