Palghar: डहाणूमध्ये 2 बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सापडले; बोट उलटल्याने झाला होता अपघात
प्रकाश पाटील (वय 32) आणि भूपेंद्र अंभिरे (वय 36) हे 26 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता डहाणू किनाऱ्यापासून काही अंतरावर मासेमारी करत असताना त्यांची छोटी बोट समुद्रात उलटली.
Palghar: समुद्रात बुडालेल्या मच्छिमाराचा मृतदेह 27 जुलै रोजी किनारपट्टीवर आढळून आला. दोन मच्छिमार एका बिगर यांत्रिकी छोट्या बोटीतून मासेमारीसाठी निघाले असताना डहाणू (Dahanu) किनाऱ्यावर उंच लाटांमुळे त्यांची बोट उलटली होती. प्रकाश पाटील (वय 32) आणि भूपेंद्र अंभिरे (वय 36) हे 26 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता डहाणू किनाऱ्यापासून काही अंतरावर मासेमारी करत असताना त्यांची छोटी बोट समुद्रात उलटली.
प्रकाशला पोहून किनार्यावर जाण्यात यश आले, परंतु भूपेंद्र मासेमारीच्या जाळ्यात अडकला आणि 27 जुलै रोजी समुद्रकिनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला. 1 जून ते 31 जुलै या कालावधीत यांत्रिकी नौकांना मासेमारी करण्यास बंदी आहे. असे असतानाही मच्छीमार कमी अंतराच्या मासेमारीसाठी बिगर यांत्रिक नौकांचा वापर करून आपला जीव धोक्यात घालत आहेत. (हेही वाचा - Thane Rain Update: ठाणे जिल्ह्यात दमदार पाऊस, भिवंडी येथे अनेक ठिकाणी साचले पाणी (Watch Video))
दरम्यान, विक्रमगड तालुक्यातील पूरग्रस्त वगर्जे नदीच्या काठावर आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून त्याची ओळख नंतर बेपत्ता झालेल्या मुसळपाडा, विक्रमगड येथील विजय पाटकर अशी झाली. विजय 27 जुलै रोजी डहाणू तालुक्यातील कासा येथे कामासाठी आला होता.
दरम्यान, कामावरून परतत असताना नदीच्या पुराच्या पाण्यात तो घसरल्याचा संशय आहे. शुक्रवारी पाण्याची पातळी खाली आल्याने त्यांचा मृतदेह नदीच्या काठावर आढळून आला. तथापी, सध्या मुंबई तसेच उपनगरात मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत.