Boat Capsized During Andheri Cha Raja Immersion: वर्सोवा बीचवर अंधेरीचा राजा विसर्जनावेळी बोट उलटली; दोन डझनहून अधिक लोक पडले समुद्रात (Watch Video)
मात्र, विसर्जनाच्या वेळी अचानक बोट उलटली, त्यामुळे बोटीवरील अनेक जण समुद्रात पडले.
Boat Capsized During Andheri Cha Raja Immersion: मुंबईच्या वर्सोवा बीच (Versova Beach) वर रविवारी अंधेरीचा राजाच्या विसर्जनाच्या (Immersion of Andheri Cha Raja) वेळी भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली (Boat Capsized). सकाळी 11:00 च्या सुमारास ही घटना घडली. बोट पलटी झाल्याने दोन डझनहून अधिक लोक समुद्रात पडले. पाण्यात पडलेल्यांना वाचवण्यासाठी प्रत्यक्षदर्शी आणि इतर उपस्थितांनी तातडीने धाव घेतली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती देताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रविवारी सकाळी अकराच्या सुमारास अंधेरीचा राजा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी वर्सोवा चौपाटीवर मोठ्या संख्येने गणेश भक्त उपस्थित होते. मात्र, विसर्जनाच्या वेळी अचानक बोट उलटली, त्यामुळे बोटीवरील अनेक जण समुद्रात पडले. अपघातानंतर काही लोक सुरक्षित पोहत पाण्यातून बाहेर आले. तसेच, ज्यांना पोहता येत नव्हते त्यांना आजूबाजूच्या कोळी समाजाच्या लोकांनी त्यांच्या छोट्या होडीतून सुखरूप बाहेर काढले. (हेही वाचा -Fishing boat capsized in Sindhudurg: मालवणमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेली बोट समुद्रात उलटली; 3 जणांचा मृत्यू)
वर्सोवा बीचवर अंधेरीचा राजा विसर्जनावेळी बोट उलटली, पहा व्हिडिओ -
दरम्यान, बोट उलटल्याने समुद्रात पडल्याने अनेकांच्या पोटात पाणी भरले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Boat Capsized in Ujani Dam: उजनी धरणात बुडालेल्या ५ जणांचे मृतदेह सापडले, एक बेपत्ता; शोध मोहिम सुरू)
ठाण्यात विसर्जनाच्या वेळी दगडफेक -
ठाण्यातील एका वेगळ्या घटनेत, 18 सप्टेंबर रोजी गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत दगडफेक केल्याप्रकरणी चार अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वंजारपट्टी नाका येथे घडली. वृत्तानुसार, जवळच्या चिकन शॉपवरून दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे गणेश मूर्तीचे नुकसान झाले. विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलमांनुसार 298 (धार्मिक भावनांचा अपमान करण्याचा हेतू), 125 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणारे कृत्य) आणि 324 (दुर्घटना) अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.