नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा नदीपात्रात बोट उलटून 40 जण जखमी
तर, अधीक गंभीर स्थिती असणाऱ्या रुग्णांना नंदुरबार आणि धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेले सर्व ग्रामस्थ हे मकर संक्रांतीनिमित्त अंघोळ करण्यासाठी नदीपात्रात गेले होते. त्यानंतर ते बोटीत बसून नदीत फेरफटका मारत होते.
Boat Accident in Narmada River: नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar District) धडगाव (Dhadgaon) येथे नर्मदा नदीत (Nandurbar District) बोट उलटून मंगळवारी (15 जानेवारी) अपघात घडला. या अपघातात सुमारे 40 जण जखमी झाले. जखमी झालेले सर्व ग्रामस्थ हे मकर संक्रांतीनिमित्त अंघोळ करण्यासाठी नदीपात्रात गेले होते. त्यानंतर ते बोटीत बसून नदीत फेरफटका मारत होते. दरम्यान, अचानक बोट पाण्यात उलटली. नदीपात्रातील भुषा डॅमजवळ ही घटना घडली. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.
प्राप्त माहितीनुसार बोटीमध्ये एकूण 50 लोक होते. हे सर्वजण अंघोळ करण्यासाठी नर्मदा नदी पात्रात आले होते. दरम्यान, प्रवाशांचे वजन बोटीला पेलले नसल्याने बोट उलटल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती कळताच प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच, मदत आणि बचाव कार्य करुन ग्रामस्थांना पात्राबाहेर काढण्यात आले. दरम्यान, त्यापैकी काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना धडगाव येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, अधीक गंभीर स्थिती असणाऱ्या रुग्णांना नंदुरबार आणि धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, कर्नाटक : बस कालव्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये शाळकरी मुलांसह 25 लोकांचा मृत्यू )
मकर संक्रांतीनिमित्त अंघोळ करण्यासाठी दरवर्षीत अनेक लोक नर्मदा नदीपात्रात येत असतात. यंदाही लोकांना अंघोळीसाठी नर्मदेच्या पात्रात गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र घटना घडलेले ठिकाण अत्यंद दुर्गम भागात असल्याने तिथपर्यंत पोहचण्यास अडथळा येत होता, असे स्थानिकांनी सांगितले.