BMC Election Ward Reservation 2022: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कोणते वॉर्ड आरक्षित? यशवंत जाधव, विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह दिग्गजांना धक्का; घ्या जाणून
मुंबई महापलिका निवडणुकीसाठी प्रभागांची आरक्षण सोडत (BMC Election Ward Reservation 2022) आज जाहीर झाली. या सोडतीमध्ये आपला प्रभाग सुरक्षित राहावा यासाठी शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP), काँग्रेससोबतच इतरही अनेक पक्षांच्या इच्छुकांनी श्वास रोखले होते. तरीसुद्धा सोडत काहींच्या मनाप्रमाणे तर काहींना दणका देणारी ठरली आहे.
मुंबई महापलिका निवडणुकीसाठी प्रभागांची आरक्षण सोडत (BMC Election Ward Reservation 2022) आज जाहीर झाली. या सोडतीमध्ये आपला प्रभाग सुरक्षित राहावा यासाठी शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP), काँग्रेससोबतच इतरही अनेक पक्षांच्या इच्छुकांनी श्वास रोखले होते. तरीसुद्धा सोडत काहींच्या मनाप्रमाणे तर काहींना दणका देणारी ठरली आहे. आरक्षण पडल्याने अनेक पक्षांचे विद्यमान नगरसेवकांवर परागंदा होण्याची वेळ आली आहे. आता त्यांना पुन्हा नगरसेवक होण्यासाठी किंवा इतर इच्छुकांनाही नगरसेवक होण्यासाठी नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. प्रामुख्याने शिवसेना नगरसेवक अमेय घोले, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आदी मंडळींना नवा प्रभाग शोधावा लागणार आहे. कारण त्यांचे प्रभाग महिला राखीव ठरले आहेत. अनेकांना असे धक्के बसले आहेत. पाहा कोणाकोणाच्या वॉर्डमध्ये बसले दिग्गजांना धक्के?
प्रभाग गमावलेले दिग्गज?
बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर- प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव
माजी महापौर किशोरी पेडणेकर- प्रभाग सर्वसाधारण झाल्याने दिलासा.
बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर- प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव
माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव- प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित
माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर- प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित
शिवसेना नगरसेवक अमेय घोले- प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित
भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे -प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित
मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज बीएमसी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. या वेळी अनुसुचीत जाती राखीव प्रभाग, अनुसूचीत जाती महिला राखीव प्रभाग, महिला राखीव विभाग आदींसाठी ही सोडत निघाली. त्यानुसार जाहीर झालेले प्रभाग खालील प्रमाणे. (हेही वाचा, Municipal Corporation Election Reservation 2022: राज्यातील 14 महापालिकांसाठी आज आरक्षण सोड, अनेकांच्या राजकीय वाटचालीचा फैसला)
अनुसुचीत जातींसाठी राखीव प्रभाग
मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक- 60, 85, 107, 119, 139, 153, 157, 162, 165, 190, 194, 204, 208, 215 आणि 221 हे अनुसुचीत जातींसाठी राखीव असतील.
अनुसूचित जाती महिला राखीव प्रभाग
मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक- 139, 190,194, 165, 107, 85, 119, 204 हे अनुसूचित जाती महिला राखीव प्रभाग म्हणून आरक्षित करण्यात आले आहेत.
महिला आरक्षित प्रभाग
महिला आरक्षित प्रभाग म्हणून 53 प्रभागांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राधान्यक्रम 1 (53) प्रभाग क्रमांक- 2, 10, 21, 23, 23, 25, 33, 34, 49, 52, 54, 57, 59, 61, 86, 90, 95, 98, 100, 104, 106, 109, 111, 118, 121, 122, 134, 144, 145, 150, 156, 159, 169, 170, 171, 172, 175, 178, 182, 184, 189, 191, 192, 201, 202, 205, 207, 212, 213, 218, 229, 230 आणि 236 यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्राधान्यक्रम 2 (33) प्रभाग क्रमांक- 5, 28, 29, 39, 45, 46, 64, 67, 69, 74, 80, 92, 103, 120, 125, 131, 142, 147, 151, 163, 168, 177, 181, 186, 187, 196, 220, 225, 226, 227, 231, 233 आणि 234 आदी समाविष्ट आहेत.
सर्वसाधारण महिला आरक्षित प्रभाग
सर्वसाधारण महिला आरक्षित प्रभाग म्हणून 23 प्रभागांची निवड करण्यात आली आहे. त्यात प्रभाग क्रमांक- 44, 102, 79, 11, 50, 154, 155, 75, 160, 81, 88, 99, 137, 217, 146, 188, 148, 96 , 9, 185, 130, 232 आणि 53 आदी प्रभागांचा समावेश आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)