BMC Notice to Shopping Malls: अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 29 शॉपिंग मॉल्सला महापालिकेने धाडल्या नोटीसा
BMC Notice to Shopping Malls: मुंबईतील शॉपिंग मॉल्सची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यामध्ये 29 मॉल्सने अग्निसुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेने नोटीसा धाडल्या असून अग्निसुरक्षिततेबद्दल लक्ष देण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर मुंबईतील अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी असे म्हटले आहे की, या 29 मॉल्समध्ये लॉकडाऊन नंतर मॉल्स सुरु करण्याची परवानगी दिल्याने त्यांनी अग्निशमनसुरक्षिततेबद्दल नियमाचे अर्धवट पालन केले आहे.(Coronavirus: मुंबई-दिल्ली विमान, रेल्वे सेवा पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता, प्रस्ताव विचाराधीन असल्याची चर्चा)
या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 250 अग्निशमन दलाचे कर्मचारी, 228 वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल झाले होते. त्यामुळेच सिटी सेंटरला लागलेली आगीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र यामध्ये अग्निशमन दलाचे 6 जण जखमी झाले होते.