पावसाळ्यात खड्ड्यांवरील तक्रारीसाठी BMCकडून 'Pothole QuickFix' अ‍ॅप आणि WhatsApp चॅटबोटची सुविधा सुरू!

मुंबई महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आधीचा खड्ड्यांच्या तक्रारीसाठीचा अ‍ॅप बंद करून आता नवीन ‘Pothole QuickFix’ अ‍ॅप विकसित केला आहे. Android आणि IOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप उपलब्ध असून, नागरिकांना खड्ड्यांचे फोटो, स्थान आणि माहिती अपलोड करून तक्रार नोंदवता येणार आहे.

पावसाळ्यात खड्ड्यांवरील तक्रारीसाठी BMCकडून 'Pothole QuickFix' अ‍ॅप आणि WhatsApp चॅटबोटची सुविधा सुरू!
Photo Credit - X

Pothole QuickFix App: मुंबई महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आधीचा खड्ड्यांच्या तक्रारीसाठीचा अ‍ॅप बंद करून आता नवीन ‘Pothole QuickFix’ अ‍ॅप विकसित केला आहे. Android आणि IOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप उपलब्ध असून, नागरिकांना खड्ड्यांचे फोटो, स्थान आणि माहिती अपलोड करून तक्रार नोंदवता येणार आहे. ही तक्रार संबंधित विभागाकडे थेट पाठवली जाईल, जेणेकरून नगर अभियंते त्वरीत कारवाई करू शकतील. सोमवारपासून महापालिकेने 8999228999 या क्रमांकावर WhatsApp चॅटबोट सेवा सुरू केली असून, ‘Pothole’ किंवा ‘PT’ हे इंग्रजी शब्द, तसेच त्यांचे मराठी समकक्ष वापरूनही नागरिक तक्रारी नोंदवू शकतात.

दरम्यान, जर 48 तासांत तक्रारीचे निराकरण निघाले नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची सूचना पाठवली जाईल. तसेच तक्रार निकाली निघाल्यावर संबंधित नागरिकाला पुष्टीसंदेश मिळेल. जर नागरिक समाधानकारक उत्तराने समाधानी नसेल, तर तो तक्रार पुन्हा उघडू शकतो. (हे देखील वाचा: Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रकल्प डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण, प्रवासाचे अंतर 25 मिनीटांनी होणार कमी)

महापालिकेने आतापर्यंत मुंबईतील 1,333 किमी रस्त्यांचे कांक्रीटीकरण पूर्ण केले असून, आणखी 700 किमी रस्त्यांचे कांक्रीटीकरण 17,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे. या पावसाळ्यात खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी 154 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).