Wankhede Stadium: वानखेडे स्टेडियमचा तात्पुरता ताबा देण्याची BMC ची MCA ला विनंती; क्वारंटाईन सेंटर म्हणून रुपांतरीत करण्याचा बीएमसीचा मानस

महाराष्ट्रसह मुंबई (Mumbai) मधील कोरोना विषाणूची (Coronavirus) परिस्थिती गंभीर आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ होत आहे. बीएमसी (BMC) त्यांच्या परीने बेड्सची सोय करणे, तसेच विलगीकरण केंद्राची सुविधा उपलब्ध करून देणे

Wankhede Stadium: वानखेडे स्टेडियमचा तात्पुरता ताबा देण्याची BMC ची MCA ला विनंती; क्वारंटाईन सेंटर म्हणून रुपांतरीत करण्याचा बीएमसीचा मानस
Wankhede Stadium 9Photo credits: Wikimedia Commons)

महाराष्ट्रसह मुंबई (Mumbai) मधील कोरोना विषाणूची (Coronavirus) परिस्थिती गंभीर आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ होत आहे. बीएमसी (BMC) त्यांच्या परीने बेड्सची सोय करणे, तसेच विलगीकरण केंद्राची सुविधा उपलब्ध करून देणे अशा गोष्टी करत आहे. मात्र वाढत्या रुग्ण संख्येसमोर आता जागाही अपुरी पडत असलेली दिसत आहे. अशात बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA), आयसीसी विश्वचषक 2011 चा अंतिम सामना ज्या ठिकाणी पार पडला, अशा आयकॉनिक वानखेडे स्टेडियमचा  (Wankhede Stadium) तात्पुरता ताबा देण्याची मागणी केली आहे.

एएनआय ट्वीट - 

Brihanmumbai Municipal Corporation has written to Mumbai Cricket Association to temporarily hand over the possession of Wankhede Stadium to BMC, for use by emergency staff of BMC and to quarantine #COVID19 positive but asymptomatic patients. pic.twitter.com/bSysIq1LgT

वानखेडे स्टेडियमचे रुपांतर महापालिकेच्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी आणि कोरोना व्हायरस एसिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह रूग्णांना (Asymptomatic Positive Patients) वेगळे ठेवण्यासाठी एक सेंटर बनवण्याचा बीएमसीचा मानस आहे.

बीएमसीने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमला विलगीकरण सेंटरमध्ये रूपांतरित करण्याच्या मागणीचे पत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनला लिहिले आहे. या मैदानाचा वापर मुंबईच्या ‘ए’ प्रभागात राहणाऱ्या आपत्कालीन कर्मचार्‍यांसाठी आणि कोविड-19 पॉझिटिव्ह रूग्णांना वेगळे ठेवण्यासाठी केला जाईल, असे या पत्रात म्हटले आहे. या जागेचे जे काही भाडे असेल तेही बीएमसीकडून वेळोवेळी दिले जाईल असेही या पत्रात लिहिले आहे. बीएमसीने पुढे म्हटले आहे की, हे अधिग्रहण तात्पुरते असणार आहे आणि त्यामुळे या मैदानाबाबत कोणताही कायदेशी हक्क बीएमसीकडे राहणार नाही. (हेही वाचा: मोदी सरकारनकडून आर्थिक पॅकेजच्या नावाखाली जनतेची क्रूर थट्टा- बाळासाहेब थोरात)

एएनआय ट्वीट -

तसेच आयपीसी कलम 188 अन्वये स्टेडियम पुन्हा हस्तांतरित केले गेले नाही तर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. वानखेडे स्टेडियम मुंबईचे प्रीमियर क्रिकेट स्टेडियम आहे. 2011 च्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप फायनलचे आयोजन इथे झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमसीएने स्टेडियम हस्तांतरित करण्यास सहमती दर्शविली आहे. मुंबईमधील वाढत्या रुग्णांची संख्या पाहता बीएमसीने क्वारंटाईन सेंटर वाढवण्याबाबत प्रयत्न सुरु केले आहेत. आत वानखेडे मैदानही त्यासाठी उपयोगी पडेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)


Share Us