Coronavirus: केईएम रुग्णालयातील जवळपास 50 रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हिंदमाता उड्डाण पुलाखाली हलवण्यात आलं; महापालिकेकडून तात्पुरती व्यवस्था

मुंबई महापालिकेकडून (BMC) या रुग्णांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि रुग्णालयातील गर्दी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला होता.

केईएम रुग्णालयातील रुग्णांची उड्डाणपुलाखाली व्यवस्था (PC - Twitter)

मुंबई महानगरपालिकेने टाटा कँसर हॉस्पिटल आणि मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील (KEM Patients) जवळपास 50 रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हिंदमाता उड्डाण पुलाखाली (Hindamata Flyover) हलवण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC) या रुग्णांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि रुग्णालयातील गर्दी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला होता.

दरम्यान, या रुग्णांची महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली आहे. या रुग्णांना लवकरचं वांद्र्यातील उत्तर भारतीय सभागृहात दाखल केलं जाणार आहे, असं पेडणेकर यांनी सांगितलं आहे. टाटा कँसर हॉस्पिटल आणि केईएम रुग्णालयातील रुग्णांची हिंदमाता उड्डाणपुलाखालील तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था करण्यात आली होती. यासंदर्भात टीव्ही9 हिंदी या वृत्तवाहिनीने वृत्त प्रकाशित केलं आहे. (हेही वाचा - Lockdown: बंदोबस्तावर असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा तलवारीने तोडला हात; पंजाब राज्यातील पटियाला येथील घटना)

महापालिकेकडून या रुग्णांना दिवसातून दोन वेळा जेवण दिलं जातं होतं. यात राज्यातील विविध भागातून मुंबईत उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा समावेश होता. तसेच या रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. या रुग्णांना अनेक समस्यांना सामोर जावं लावत असल्याचा समोर आलं होतं. या रुग्णांसाठी पालिकेने कोणत्याही डॉक्टर्स किंवा नर्सची सुविधा केली नव्हती.

पालिकेकडून देण्यात येणाऱ्या जेवण तसेच नाशत्यासाठी रुग्णांच्या लांबचं लांब रांगा लागल्या होत्या. सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत या रुग्णांना चक्क उड्डाणपुलाखाली व्यवस्था केल्याने विरोधकांकडून पालिकेवर टिका करण्यात येत आहे. लवकरचं या रुग्णांची वांद्र्यातील उत्तर भारतीय सभागृहात व्यवस्था करण्यात येणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.