मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने नागरिकांकडून आतापर्यंत 4.78 कोटी रुपयांच्या दंडाची वसूली
राज्यातील विविध शहरांमध्ये कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता त्याच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर नागरिकांना घराबाहेर पडताना आणि सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. मात्र काही नागरिकांकडून याचे सातत्याने उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. याच कारणास्तव मास्क न घालणाऱ्या नागरिकांच्या विरोधात एप्रिल महिन्यापासून ते आतापर्यंत कारवाई केली गेली आहे. या कारवाईत महापालिकेने तब्बल 4.78 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.(मुंबईत Mask न घालणाऱ्या 9 हजार जणांच्या विरोधात BMC ची कारवाई, 18 लाखांचा दंड वसूल)
अद्याप कोरोना व्हायरसवर लस उपलब्ध नसल्याने जगभरातील वैज्ञानिकांकडून त्यावर संशोधन केले जात आहे. मात्र अद्याप प्राथमिक स्वरुपात नागरिकांनी सॅनिटायझर, मास्क किंवा सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे अशा सुचना वारंवार दिल्या जात आहेत. जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा वेग मंदावला जाऊ शकतो. परंतु नागरिकांकडूनच मास्क न घालणे, रस्त्यांवर थुंकणे असे प्रकार कोरोनाच्या काळात सुरु असल्याचे सर्रास दिसून येत आहेत. याच कारणास्तव आता महालिकेकडून अशा नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.(Free Covid-19 Testing in Mumbai: सोमवारपासून मुंबईमध्ये 244 ठिकाणी होणार कोरोना विषाणू साठी विनामूल्य चाचणी; जाणून घ्या कुठे कराल चेक)
दरम्यान, महापालिकेकडून कोरोनाच्या परिस्थिती बद्दल जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी शहरात No Mask No Entry असे 20 लाख स्टिकर्सचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क घालणे लक्षात राहिल हे यामागील उद्दिष्ट आहे. मात्र जर एखाद्या नागरिकाने दंड देण्यास नकार दिल्यास त्याला सार्वजनिक ठिकाणी कचरा काढण्याची शिक्षा सुद्धा दिली जाणार आहे.