Pune: भाजप 14 मार्चपूर्वी अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजचे करणार उद्घाटन, सप्टेंबरमध्ये प्रवेश होणार सुरू

यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (National Medical Commission) अंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय मूल्यमापन आणि मानांकन मंडळाकडून परवानगी मिळाली आहे.

Doctor | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

पुणे महानगरपालिकेने (PMC) नागरी संस्था संचालित अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी (Atal Bihari Vajpayee Medical College) एमबीबीएस (MBBS) प्रवेश सुरू करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (National Medical Commission) अंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय मूल्यमापन आणि मानांकन मंडळाकडून परवानगी मिळाली आहे. आता भारतीय जनता पक्ष (BJP) त्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले आहे.  निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ 14 मार्च रोजी संपणार असून, पालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) 15 मार्चपासून प्रशासक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन 14 मार्चपूर्वी महाविद्यालयाचे उद्घाटन (Inauguration) करण्याचा भाजपचा विचार आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, आम्ही येत्या काही दिवसांत कॉलेजचे उद्घाटन करण्याचा विचार करत आहोत. आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि राज्याच्या आरोग्य मंत्री भारती पवार यांना आमंत्रित करण्याचा विचार करत आहोत. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे म्हणाले, भाजपला पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाविद्यालयाचे उद्घाटन करायचे होते, परंतु तेव्हा अंतिम मंजुरी मिळाली नाही आणि उद्घाटनाला उशीर झाला. हेही वाचा Ashish Shelar Demands: महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यात यावी, आमदार आशिष शेलारांची मागणी

नाव न छापण्याची विनंती करणाऱ्या भाजपच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कार्यकाळ संपण्यापूर्वी उद्घाटन झाले नाही, तर कॉलेज सुरू करण्यासाठी त्यांनी केलेल्या मेहनतीचे श्रेय पक्ष घेऊ शकणार नाही. सप्टेंबरमध्ये प्रवेश सुरू होतील आणि महापालिकेत नवीन प्रशासक येण्याची शक्यता आहे.केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया उपलब्ध नसल्यास, पक्षाचे सदस्य त्यांना आभासी उद्घाटनासाठी आमंत्रित करतील आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.