महाविकास आघाडी सरकारचं बारा बलुतेदार आणि श्रमिकांसाठीचं पॅकेज ऐकून भाजपला भोवळ येईल - हसन मुश्रीफ

महाविकास आघाडी सरकारचं बारा बलुतेदार आणि श्रमिकांसाठीचं पॅकेज ऐकून भाजपला भोवळ येईल, असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. भाजपने महाराष्ट्रासाठी 50 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करावं तसेच इतर मागण्यांसाठी 'माझं अंगण, माझं रणांगण' हे आंदोलन सुरु केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी भापला टोला लगावला आहे.

Hasan Mushrif | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारदेखील आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारचं बारा बलुतेदार आणि श्रमिकांसाठीचं पॅकेज ऐकून भाजपला भोवळ येईल, असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. भाजपने महाराष्ट्रासाठी 50 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करावं तसेच इतर मागण्यांसाठी 'माझं अंगण, माझं रणांगण' हे आंदोलन सुरु केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी भापला टोला लगावला आहे.

केंद्र सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, त्यात सर्व कर्जचं आहे. पेंडिंग आणि लेंडिंगमध्ये खूप फरक आहे. या पॅकेजमुळे नागरिकांचा कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार राज्यातील बारा बलुतेदार आणि श्रमिकांसाठी मोठं पॅकेज देणार आहे. हे पॅकेज पाहून भाजपचे डोळे पांढरे होतील, असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स)

दरम्यान, यावेळी मुश्रीफ यांनी भाजपवर जीएसटीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकार कसं अडचणीत येईल? यासाठी भाजपचे प्रयत्न करत आहे. मुंबईतून सर्व पैसे पीएम केअरला गेले. यातील केवळ 400 कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले. उत्तर प्रदेशला 1500 कोटी रुपये दिले. हा कोणता न्याय? असा प्रश्नही यावेळी हसन मुश्रीफ यांनी विचारला. शेतकरी, असंघटित कामगार, मजूर, बारा बलुतेदारांना तसेच गरिबांसाठी 50 हजार कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला मुश्रीफ यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.