भाजप-शिवसेना तुटेपर्यंत ताणणार की 'ठरलंय तसंच करणार'? काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राजकीय वर्तुळातही भाजप-शिवसेना सत्तासंघर्ष (Shiv Sena BJP power struggle) थोडक्यात आटोपणार की तुटेपर्यंत ताणत राहणार याबाबत उत्सुकता वर्तवली आहे.

BJP-Shiv Sena Alliance

शिवसेना (Shiv Sena) आमदारांची एक बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) येथे पार पडली. या बैठकीत आमदार एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ गटनेता पदी निवड करण्यात आली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला राजकीय दृष्ट्या मोठे महत्त्व आहे. कारण, या बैठकीच्या आगोदर शिवसेना आमदारांनी एका बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भातील सर्व अधिकार ठरावद्वारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. त्यामुळे या बैठकीनंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. राजकीय वर्तुळातही भाजप-शिवसेना सत्तासंघर्ष (Shiv Sena BJP power struggle) थोडक्यात आटोपणार की तुटेपर्यंत ताणत राहणार याबाबत उत्सुकता वर्तवली आहे.

शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा तपशील सूत्रांच्या हवला देत प्रसारमांध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. या वृत्तात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे वक्तव्य करायला नको, अशी नाराजी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्याचे म्हटले आहे. शिवसेना-भाजप सत्तावाटपाच्या चर्चेत मुख्यमंत्री किंवा 50-50 असा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारीक चर्चेदरम्यान केले होते. त्याचे प्रचंड पडसाद शिवसेनेच्या गोटात उमटले आहेत. (हेही वाचा, 'आमचं ठरलंय' ते आमचं तुटतंय? भाजपच्या फुग्याला शिवसेनेची टाचणी? काँग्रेस, राष्ट्रवादी पाहतंय दुरुन मजा)

विधमंडळ नेतेपद निवडीच्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, मित्रपक्षाला आम्ही शत्रूपक्ष मानत नाही. मात्र, दिवाळीदिवशी मुख्यमंत्र्यांनी असे विधान करायला नको होते. त्यांच्या विधानानंतर चर्चा फिसकटली. सध्या बऱ्याच अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, त्यात तथ्य नाही. भाजपकडून अद्याप तरी कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे त्यावर चर्चा नाही. मात्र, जे ठरलंय तसंच होईल, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांचे अभिनंदनही केले. (हेही वाचा, 'आमचं ठरलंय पण, मुख्यमंत्री पदावर अडलंय', भाजप-शिवसेना '50-50 फॉर्म्युला' सोशल मीडिया, जनतेत थट्टेचा विषय  )

शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून परस्परविरोधी विधाने केली जात आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तर 'विनाशकारे विपरीत बुद्धी' असा टोला लगावला आहे. तर, विनाशकारे विपरीत बुद्धी शिवसेनेची नव्हे तर भाजपची आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, शिवसेना बदलली नाही. ती जिथे आले तिथेच आहे. राजकारणात पर्याय सर्वांनाच खुले असतात. ज्यांच्या मनात पाप आहे त्यांनी पर्याय शोधावेत. परंतू, आम्हाला युतीधर्म पाळायचा आहे. भाजपनेही तो पाळावा. शिवसेना हा छोटा पक्ष नाही. सत्तावाटपाचे जे सूत्र ठरले आहे तसेच व्हावे. जर शब्द दिला आहे तर तो पाळला गेला पाहिजे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील हा सत्तासंघर्ष थोडक्यात मिटणार की, तुटेपर्यंत ताणला जाणार याबबत उत्सुकता आहे.