Eknath Khadse On Devendra Fadnavis: 'पक्षाने ऐकले नाही म्हणूनच जनतेच्या दरबारात बोलावे लागले' एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर
आपण संयम बाळगून आहोत. मी अद्यापही संयम बाळगून आहे. घरची धुणी मी रस्त्यांवर कधीच धुत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यावर खडसे यांनी पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या उत्तरावर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे. माझ्यावर झालेल्या आरोपांनंतर मी माझी भूमिका पक्षाला सांगितली होती. मात्र, पक्षात माझं कोणी ऐकंल नाही. पक्षात ऐकलं नाही म्हणूनच मला जनतेच्या दरबारात बोलावं लागलं, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे यांनी केलेल्या 'ड्राय क्लिनर मुख्यमंत्री' या टीकेला देवेंद्र फडणीस यांनी नुकतेच प्रत्युत्तर दिले होते. आपण संयम बाळगून आहोत. मी अद्यापही संयम बाळगून आहे. घरची धुणी मी रस्त्यांवर कधीच धुत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यावर खडसे यांनी पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, एकनाथ खडसे यांना दाऊद प्रकरणात नव्हे तर, भोसरी येथील जमीन प्रकरणात राजीनामा द्यावा लागल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. परंतू, भोसरी येथील जमीन ही एमआयडीसीची नव्हती. या जमीनीत एकनाथ खडसे यांचा काहीही संबंध नाही. ती जमनी आजही मूळ मालकाच्या नावे आहे. ती जमीन माझी पत्नी आणि जावयांनी खरेदी केली आहे. तीही जमनी नियमाने जे शुल्क आहे ते भरून खरेदी केली आहे. त्यामुळे त्यात कुठेही घोटाळा झाला नाही. परंतू माझ्यावर जाणीवपूर्वक आरोप करण्या आले. त्रास देण्यात आला. मी माझी भूमिका पक्षाला सांगितली. मात्र, तरीही माझे कोणी ऐकले नाही. त्यामुळे पक्षात ऐकले नाही म्हणून जनतेच्या दरबारात बोललो, असे खडसे यांनी म्हटले आहे. त्याच वेळी विश्वासात घेतले असते तर मला बाहेर बोलावे लागले नसते, असे खडसे यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे यांच्या जीवनावर आधारीत सुनील नेवे लिखित पुस्तकाचे खडसे यांच्या हस्ते प्रकाश झाले. या प्रकाशन कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. खडसे यांनी काल केलेल्या टीकेला फडणवीस यांनी आज उत्तर दिले होते. उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, मी अद्यापही संयम बाळगून आहे. घरची धुणी मी रस्त्यांवर कधीच धुत नाही. एकनाथ खडसे हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी टीका, टीप्पणी करणार नाही. परंतू, ते ज्या मनीष भंगाळे प्रकरणावरुन बोलतात त्याबाबत मी एक नक्की सांगतो की, खडसे यांना त्या प्रकरणावरुन राजीनामा द्यावा लागला नाही.
पुढे बोलता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वास्तवात भंगाळे याने आरोप केल्यानंतर मी स्वत: एक कमिटी तयार केली. या कमिटीला 12 तासात अहवाल द्यायला सांगितला. त्यानंतर बारा तासातच त्यांना क्लिन चिट मिळाली. या क्लिन चिटलाही ते जर ड्राय क्लिनर म्हणत असतील तर त्याबाबत मला माहिती नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मनीष भंगाळे याला अटक झाली होती. तो काही काळ तुरुंगातही होता. दरम्यान एमआयडीसी प्रकरणात खडसे यांनी स्वत: बैठका घेऊन निधी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
एकनाथ खडसे यांनी आगोदर म्हटले होते की, आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?. नाथाभाऊ हा अन्याय सहन करणाऱ्यांपैकी मुळीच नाही. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही. आपण पक्षाच्या विरोधात बोलणार नाही. परंतू, न्याय मिळेपर्यंत पक्षाला प्रश्न विचारत राहणार.