Narayan Rane: नारायण राणे म्हणाले 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकार्य केले, कोणतीही आडकाठी आली नाही'
त्यावर सही करा अशी विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यांनी सही केली. कॉलेजच्या कामात कोणतीही आडकाठी आली नाही, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.
शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) मार्गे भाजप (BJP ) असा राजकीय प्रवास केलेले खासदार नारायण राणे (BJP MP Narayan Rane) यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे कौतुक केले आहे. निमित्त ठरले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पडवे-कसाला येथे उभारण्यात आलेल्या लाइफ टाइम मेडिकल कॉलेजचे. या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होत आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने माहिती देताना नारायण राणे ( Narayan Rane) ) बोलत होते. या वेळी राणे यांनी सांगितले की, कोकणातील मेडिकल कॉलेज संदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना फोन (Narayan Rane called Uddhav Thackeray ) केला होता. माझ्या मेडीकल कॉलेजची फाईल आपल्याकडे आली आहे. त्यावर सही करा अशी विनंती मी त्यांना केली होती. त्यांनी सही केली. कॉलेजच्या कामात कोणतीही आडकाठी आली नाही, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक मेडीकल कॉलेज उभा राहावे अशी नारायण राणे यांची प्रदीर्घ काळापासूनची इच्छा होती. त्यांची ही इच्छा आता पूर्ण होताना दिसत आहे. मेडीकल कॉलेजच्या उद्घाटन कार्यक्रमाबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले, अनेक वर्षांनी माझे स्वप्न साकार होत आहे. कोकणात मेडीकल कॉलेज होत आहे. माझ्या आयुष्यातील हा एक आनंदाचा क्षण आहे. या कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील प्रथमच कोकणात येत आहेत. हा देखील माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे, असे राणे म्हणाले.
कोकण आणि सिंधुदुर्गातील जनतेने साथ दिली. त्यामुळेच मी राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारु शकलो. त्याबद्दल इथल्या जनतेचा मी नेहमीच ऋणी आहे. मला जिल्ह्यातील जनतेसाठी काही करता आले याचा आनंद आहे. जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य ठणठणीत राहावे. सिंधुदुर्गातही डॉक्टर्स घडावेत यासाठी या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल उभारण्यात यावे असे माझे स्वप्न होते. हे स्वप्न अखेरीस पुर्णत्वास येत आहे, असे राणे म्हणाले. (हेही वाचा, Narayan Rane On Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारी, लवकरच पुरावे देणार; भाजप नेते नारायण राणे यांचा इशारा)
दरम्यान, हे स्वप्न पूर्ण होताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहकार्य कसे लाभले, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी केला. यावर राणे म्हणाले, कोणत्याही जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी राज्य सरकारच्या काही परवानग्या आवश्यक असतात. त्यामुळे या कॉलेजसाठीही राज्य सरकारची परवानगी आवश्यक होती. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यापैकी कोणीच कॉलेजच्याकामात आडकाठी आणली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मला चांगले सहकार्य मिळाले. कॉलेजच्या परवानगीची फाईल राज्य सरकारकडे आली तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना फोन केला. त्यांना माझ्या कॉलेजची फाईल आपल्याकडे आली आहे. त्यावर सही करा अशी विनंती मी त्यांना केली. त्यांनी विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत सही केली. यावर मी त्यांना मी धन्यवादही दिल्याचे राणे यांनी सांगितले.