यंदा राम कदम यांच्या दही हंडी सोहळ्याचे आयोजन रद्द, पुरग्रस्तांना मदत करणार
हा सण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. तसेच दही हंडीसाठी मानवी मनोऱ्यांचा थरार पाहण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसून येतात.
दंही हंडीचा (Dahi Handi) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. तसेच दही हंडीसाठी मानवी मनोऱ्यांचा थरार पाहण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसून येतात. त्याचसोबत विविध गोविंदा पथके ठिकठिकाणी आयोजित केलेल्या दही हंडी सोहळ्याच्या आयोजनात भाग घेताना दिसून येतात. तर मुंबईतील प्रसिद्ध दंही हंडी पैकी एक अशी ओखळ असणाऱ्या राम कदम (Ram Kadam) यांच्या दही हंडीचे यंदा आयोजन रद्द करण्यात आले आहे.
भाजप आमदार राम कदम हे घाटकोपर येथे मोठ्या प्रमाणात दही हंडीचा उत्सवाचे आयोजन करतात. या ठिकाणची दही हंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथके मानवी मनोरा रचत ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. तसेच राम कदम यांची दही हंडी पाण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी असते. मात्र सध्या महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली येथे झालेल्या पुरस्थितीमुळे यंदाच्या दही हंडी सोहळ्याचे आयोजन राम क कदम यांनी रद्द केले आहे. तर सोहळ्यासाठी वापरण्यात येणारी सर्व रक्कम पुरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचसोबत अन्य दही हंडी आयोजनकांनी सोहळा रद्द करावा किंवा तो साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले आहे.(पुरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाकडून 25 लाखांची मदत जाहीर, नुकसान झालेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार)
राम कदम यांच्या दही हंडीला दिग्गज कलाकारांची उपस्थिती आतापर्यंत दिसून आली. मात्र गेल्या वर्षी राम कदम यांच्या दही हंडी वेळी त्यांनी 'एखादी मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यासाठी मी मदत करेन' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकारावर महिलांसह नागरिकांना संताप व्यक्त केला होता. हे प्रकरण राज्य महिला आयोगापर्यंत सुद्धा पोहचल्याने चांगलेच गाजले होते.