भाजप नेते संजय काकडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश? शरद पवार यांच्याकडून निमंत्रण असल्याची माहिती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. मात्र, बहुमत सिद्ध न करता आल्याने भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले होते.

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या (NCP) अनेक नेत्यांनी आपला पक्ष सोडून भाजपचे कमळ हाती घेतले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. मात्र, बहुमत सिद्ध न करता आल्याने भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले होते. तेव्हापासून भाजपची घसरण सुरु झाल्याची चिन्ह दिसू लागले आहेत. त्यानंतर भाजपचे काही नेते इतर पक्षात गेले. यातच भाजपचे नेते संजय काकडे (Sanjay Kakde) हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत संजय काकडे यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. महत्वाचे म्हणजे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून त्यांना आमंत्रण मिळाले असून जळगाव येथे होणाऱ्या मेळाव्यात ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील, असेही सांगितले जात आहे. तसेच जळगावमध्ये होणाऱ्या मेळाव्यात ते राष्ट्रवादी प्रवेश करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यसभा निवडणुकीचा कार्यकाळ संपल आला असून पुढच्या महिन्यात महाराष्ट्रात 7 जागांसह 55 जागांची निवडणूक होणार आहे. भाजपकडून 2 खासदार निवडून जाण्याची शक्यता आहे. पंरतु, या यादीतून संजय काकडे यांचे नाव वगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर संजय काकडे यांनी नाराजी दर्शवली असून येत्या 2, 3 दिवसांत उमेदवारी जाहीर झाली नाही तर, ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत अन्य काही कार्यकर्तेही राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेत सत्ता तसेच भाजपमध्ये आमदारांची संख्या वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. तरीदेखील त्यांना भाजपकडून डावलण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे देखील वाचा- स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव प्रस्तावावरुन राज्य विधिमंडळात वातावरण तापले; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठं विधान; 5 मुद्दे

महत्वाचे म्हणजे, संजय काकडे आणि शरद पवार यांच्यात चांगले संबंध असल्याचे समजत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. महत्वाचे म्हणजे, संजय काकडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील का? येत्या दोन,तीन दिवसात सर्वांनाच कळेल. तसेच त्यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या इतर नेत्यांची नावे अद्याप समोर आली नाही.