Mohit Kamboj Car Attack: भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला, भाजप आक्रमक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. मोहित कंबोज इथे आलाच कसा, असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी विचारला आहे. तसेच, मोहित कंबोज रेकी करण्यासाठी आले होते का?, अशी चर्चाही मातोश्रीबाहेर सुरु आहे.

Mohit Kamboj Car Attack: भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला, भाजप आक्रमक
Mohit Kamboj (Photo Credits-ANI)

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण (Ran Couple Hanuman Chalisa Recite) करणार असल्याचे सांगितले असता आज राणा आणि सेना चांगलाच वाद पाहायला मिळाला. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता शिवसैनिकांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला (Shivsainik Attack Mohit Kamboj Car) असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. मोहित कंबोज इथे आलाच कसा, असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी विचारला आहे. तसेच, मोहित कंबोज रेकी करण्यासाठी आले होते का?, अशी चर्चाही मातोश्रीबाहेर सुरु आहे.

तसेच याप्रकरणी मोहित कंबोज यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून त्यांनी लेखी तक्रार नोंदवली आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन या घटनेतील सत्य समोर येऊ शकतं, असंही मोहित कंबोज यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या हल्ल्याचा राजकीय सूत्रधार कोण आहे? याचा तपास करण्यात यावा, असंही कंबोज यांनी तक्रारीत म्हटलं आहे. कलम 307,149,506(2)आयपीसी 34 अन्वये एफआयआर नोंदवून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी मोहित कंबोज यांनी तक्रारीतून मुंबई पोलिसांकडे केली आहे.(हे देखील वाचा: Navneet Rana, Ravi Rana यांच्या 'मातोश्री' बाहेरील हनुमान चालिसा पठणाच्या हट्टावर गृहमंत्री Dilip Walse Patil यांची प्रतिक्रिया; राणा दाम्प्त्याला दिला सल्ला!)

रवी राणा आणि नवनीत राणा काल अमरावती मधून मुंबईत दाखल झाले आहेत. तेव्हापासूनच मातोश्री जवळ शिवसैनिकांनी जमायला सुरूवात केली आहे. अनेक नेते, कार्यकर्ते मागील 24 तासांपासून मातोश्री बाहेर रस्त्यावर बसलेले दिसत आहेत. मुंबईत शिवसैनिक आक्रमक  दिसत आहेत. राणा यांच्या निवासस्थानी घोषणाबाजी केली जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2022 11:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).