'हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे' भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी

हृदय विकाराचा धक्का आल्याने पीडीताची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आज सकाळी 6.55 मिनिटांनी पीडिताने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात (Orange City Hospital and Research Centrer) अखेरचा श्वास घेतला.

Devendra Fadnavis | (PTI)

हिंगणघाट (Hinganghat) जळीतकांडातील पीडित शिक्षेकेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. हृदय विकाराचा धक्का आल्याने पीडीताची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आज सकाळी 6.55 मिनिटांनी पीडिताने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात (Orange City Hospital and Research Centrer) अखेरचा श्वास घेतला. यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याशिवाय आमच्या मुलीने जे सहन केले, मात्र, आरोपीची अवस्थाही तिच्याप्रमाणे झाली पाहिजे. त्याला जनसमुदायासमोर बाहेर काढा, त्याच्यावरही हल्ला व्हायला हवा, तेव्हाच तिच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी उद्विग्नता मयत शिक्षिकेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

24 वर्षीय शिक्षिका नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. मात्र, 3 फेब्रुवारी रोजी पीडित शिक्षिका कामावर जात असाताना आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत पेटवून दिले होते. यात पीडिता 20 ते 30 भाजली होती. दरम्यान पीडित शिक्षेकेचा चेहरा जळाला होता. त्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. परंतु आज सकाळी पीडित शिक्षकेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरच्या खात्यावरून आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ती आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी अद्दल त्याला घडली पाहिजे, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. हे देखील वाचा-हिंगणघाट पीडितेच्या कुटुंबातील एकाला मिळणार सरकारी नोकरी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चेनंतर मृतदेह स्वीकारण्याचा नातेवाईकांचा निर्णय

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

हिंगणघाट मधील जळीत कांडातील पीडितेचा मृतदेह स्विकारण्यास पीडितेच्या नातेवाईकांनी तयारी दर्शविली असली तरीही गृहमंत्र्यांनी आश्वासन लिखित स्वरुपात द्यावे ,यासाठी त्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मध्यस्थीनंतर तिच्या कुटूंबियांनी मृतदेह स्विकारण्यास तयारी दर्शविली होती. मात्र, आता 'लिखित स्वरुपात आश्वासन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे' सांगत मृत पीडितेच्या नातेवाईकांनी हिंगणघाटमध्ये ठिय्या आंदोलन केले आहे.