Solapur News: सोलापूरात भाजपला मोठा धक्का; 50 गावच्या सरपंच व उपसरपंचांचा BRS पक्षात प्रवेश

आगामी काळात सोलापुरात होणाऱ्या सर्वच निवडणूका बीआरएस पक्ष लढवणार आहे

K. Chandrashekar Rao | (Photo Credits: Facebook)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांच्या भारतीय राष्ट्र समिती (Bhartiya Rashtriya Samiti) या पक्षाने महाराष्ट्रात (Maharashtra) पद्धतशीरपणे पाय पसरण्यास सुरुवात केली अशून तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या सीमे जवळील जिल्ह्यांना आता त्यांनी टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आषाढी वारीत पंढरीच्या दर्शनाचे औचित्य साधून सोलापुरातील राजकीय वातावरणात प्रवेश केला होता. शहरातील पूर्व भाग,उत्तर सोलापूर मतदार संघानंतर केसीआर यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे.  दक्षिण सोलापूर तालुक्यातील सचिन सोनटक्के यांनी जवळपास 60 वाहनांचा ताफा व दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावच्या सरपंचाना अशा एकूण 350 जणांना घेऊन हैदराबादकडे रवाना झाले आणि बीआरएस पक्षात प्रवेश केला. (हेही वाचा - Rahul Gandhi आज लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावर चर्चेला सुरूवात करण्याची शक्यता)

या पक्ष प्रवेशामुळे सर्वात मोठा झटका हा भारतीय जनता पक्षाला बसला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील 38 गावातील विद्यमान सरपंच, 12 माजी सरपंच, 12 ग्रामपंचायत सदस्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदार संघातील सरपंच व नेते बीआरएसच्या पक्षात गेल्याने भाजपला जबरदस्त हादरा बसला आहे.

आगामी काळात सोलापुरात होणाऱ्या सर्वच निवडणूका बीआरएस पक्ष लढवणार असल्याची माहिती सचिन सोनटक्के यांनी बोलताना दिली.दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतकरी वर्ग, मतदार हे विद्यमान भाजप आमदराला वैतागलेला आहे. बीआरएस हा पक्ष शेतकऱ्यांसाठी अनुकूल पक्ष आहे,असे सचिन सोनटक्के यांनी सांगितले.

 

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif