Rohit Pawar On BJP: भाजपचं बारामती पवारमुक्त तर मुंबई ठाकरेमुक्त करायचं लक्ष, रोहित पवारांचा भाजपला खोचक टोला

आज बारामती पवारमुक्त करायची, मुंबई ठाकरेमुक्त करायची या दोन विषयांवर भाजपाचं राजकारण केंद्रीत आहे, असा खोचक टोला रोहित पवार यांनी देखील भाजपला लगावला आहे.

NCP MLA Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

लोकसभा (Loksabha) किंवा विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीला (Election) आणखी दोन वर्ष वेळ असला तरी भाजपने (BJP) मात्र दोन्ही निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर आत्ताचं कंबर कसली आहे. यावेळी  भाजपच्या केंद्रस्थानी आहे तो महाराष्ट्रातील (Maharashtra) बारामती (Baramati) मतदार संघ. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभुमिवर बारामती मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर येणाऱ्या कालावधीत सितारमण बारामतीचा दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच महाराष्ट्र भाजपचे (Maharashtra BJP) नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी देखील नुकताच बारामतीचा दौरा केला आहे. प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभआर सांभाळल्यावर बावनकुळेंचा हा पहिला आणि महत्वाचा दौरा म्हणायला हरकत नाही. तर भाजपच्या या मिशन बारामतीवरवर राष्ट्रवादीकडून (NCP) विविध प्रतिक्रीया उमटत आहेत.

 

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील भाजपला (BJP) खोचक टोला लगावला आहे. आज बारामती (Baramati) पवारमुक्त करायची, मुंबई (Mumbai) ठाकरेमुक्त करायची या दोन विषयांवर भाजपाचं राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे (Unemployment) प्रश्न, बेरोजगारी कमी करणं, शेतकऱ्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत, अशी प्रतिक्रीया देत रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवं, असा सल्ला रोहित पवारांनी भाजपला दिला आहे.

 

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील भाजपच्या या मोर्चे बांधणीवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. अजित पवार म्हणालेत बारामतीत (Baramati) माझं काम बोलते. त्यामुळं तुम्ही  बारामतीची काळजी करु नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारे कोण असेल तर बारामतीकर त्याचा विचार करतील असे अजित पवार म्हणाले. कोणीही बारामतीमध्ये यावं. सर्वांचे बारामतीकर स्वागत करतात. पण मतदाना दिवशी कुठे मत द्यावं हे त्यांना खूप चांगल माहित असल्याची प्रतिक्रीया अजित पावर यांनी दिली आहे.