Mumbai: भाईंदर येथील भाजपचे कार्यकर्ते राजन पांडे यांच्यावर चाकू हल्ला, गुन्हा दाखल (Watch Video)

भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्ली परिसरात विनोद राजभर यांचा भाजप युनिटचे (युवा शाखा) सचिव राजन पांडे यांच्यासोबत वाद झाला. या वादाचे भांडणात रुपांतर झाले. भांडणात विनोद यांनी राजन पांडे यांच्यावर चाकूने वार केला.

Mumbai: भाईंदर येथील भाजपचे कार्यकर्ते राजन पांडे यांच्यावर चाकू हल्ला, गुन्हा दाखल (Watch Video)
BJP youth wing secretary Rajan Pandey attacked Photo credit X

Mumbai: भाईंदर (Bhaindar) पश्चिम येथील शिवसेना गल्ली परिसरात विनोद राजभर यांचा भाजप युनिटचे (युवा शाखा) सचिव राजन पांडे यांच्यासोबत वाद झाला. या वादाचे भांडणात रुपांतर झाले. भांडणात विनोद यांनी राजन पांडे यांच्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. (हेही वाचा- चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या, दोघांनी केला होता प्रेमविवाह, रोज होत असे भांडण)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सांयकाळी भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्ली परिसरात दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला त्यांच्यात मारामारी सुरु झाली. विनोद राजभर यांनी रागाच्या भरात चाकूने वार केला. या घटनेचा एकाने व्हिडिओ शूट केला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजभरने पांडे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या पोटात चाकूने वार केला.

राजन पांडे यांच्यावर चाकू हल्ला पाहा व्हिडिओ

रक्तबंबाळ झालेले पांडे यांना मीरा रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक रहिवाशांनी ही घटना मोबाईल फोनमध्ये कैद केली. या मारहाणीत कोणीही मद्यस्थी केले नाही. गुटखा तस्करीच्या अवैध धंद्यात पांडेचा सहभाग असल्याचा संशय असल्याची माहिती मिळाली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2024 08:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).