Bird Flu in Maharashtra: महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; परभणीत 800 कोंबड्यांचा मृत्यू
परंतु, परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेचं झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. तीन दिवसांपूर्वी मुरुंबा येथे 800 कोंबड्या मरण पावल्या होत्या.
Bird Flu in Maharashtra: देशात कोरोना विषाणूचं (Coronavirus) संकट अद्याप टळलेलं नाही. अशातचं आता केंद्र सरकारने केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत बर्ड फ्लूचा (Bird Flu) फैलाव झाल्याची घोषणा केली. या राज्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातदेखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. राज्यातील परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात तब्बल 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिली आहे.
या घटनेनंतर परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंरुबा गावातील सर्व कोंबड्या आणि पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रदुर्भाव झाला नसल्याचं म्हटलं होतं. परंतु, परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेचं झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. तीन दिवसांपूर्वी मुरुंबा येथे 800 कोंबड्या मरण पावल्या होत्या. त्यानंतर या कोंबड्यांचा मृत्यू नेमकी कशाने झाला हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने मध्ये प्रदेशमधील भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. कोंबड्यांच्या मृत्यूच्या नमुन्याच्या रिपोर्टमध्ये त्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. (Bird Flu Update: भारतात कोरोना महामारी दरम्यान 'बर्ड फ्लू'मुळे दहशत; 'या' राज्यात अलर्ट)
राज्यात कावळे, बगळे, गिधाडे, पोपट अशा पक्षांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं समोर आलं आहे. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे 350 कोंबड्यांचा मृत्यू झाला. अद्याप या कोंबड्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. (Chicken Found Dead In Maharashtra: कोंबडी मरण्याचे सत्र महाराष्ट्रात सुरुच, लातूरमध्ये 350 कोंबड्या ठार; अनेकांना सतावतोयत Bird Flu संसर्गाचा धोका)
बर्ड फ्लूच्या भीतीने देशातील कोंबड्यांच्या मांस खरेदीमध्ये मोठी घट झाली आहे. कोंबडीच्या मांसाचे दर 200 रुपये प्रतिकिलोवरुन 150 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. ज्या राज्यांना बर्ड फ्लूचा अलर्ट देण्यात आला अशा राज्यात सध्या संक्रमित कोंबड्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.