Payal Tadvi Suicide Case: पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील मोठे अपडेट, न्यायालयाने फेटाळली 3 डॉक्टरांची मुक्तता याचिका

तसेच 20 जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी तडवी यांच्या कुटुंबियांना ही रक्कम भरावी लागेल, असे सांगितले आहे.

Payal Tadvi (PC - X/@Windancer2706)

Payal Tadvi Suicide Case: विशेष एससी एसटी न्यायालयाने 26 वर्षीय पायल तडवी (Payal Tadvi) हिच्या आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेरे आणि डॉ. बीवायएल नायर रुग्णालयाच्या डॉ. हेमा आहुजा या तीन वरिष्ठ डॉक्टरांची मुक्तता याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने या डॉक्टरांना प्रत्येकी 25,000 रुपये खर्च ठोठावला आहे. तसेच 20 जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी तडवी यांच्या कुटुंबियांना ही रक्कम भरावी लागेल, असे सांगितले आहे.

यासंदर्भात सविस्तर आदेश काही दिवसांत उपलब्ध होईल. या खटल्याची सुनावणी सुरू करण्यासाठी पुढील तारखेला आरोप निश्चित करण्यावर सुनावणी केली जाईल, असे न्यायालयाने सांगितले. बीवायएल नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टर असलेल्या तडवी (वय, 26) यांनी 22 मे 2029 रोजी आत्महत्या केली होती. (हेही वाचा - Payal Tadvi Suicide Case: आरोपी सिनियर डॉक्टर्सना 21 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी)

तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की तिला हे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करण्यात आले. कारण तिन्ही आरोपींनी तिचा छळ केला. कारण ती आदिवासी समाजातील होती. तथापि, डॉक्टरांनी आपल्या याचिकांमध्ये तडवीच्या आत्महत्येमध्ये त्यांची कोणतीही भूमिका नसल्याचं म्हणत ती तणावाखाली होती, असं म्हटलं आहे. (पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कुटुंबाला सरकार कडून 10 लाखाची मदत जाहीर) 

फिर्यादी आणि वकील तक्रारदाराने दोघांनीही याचिकेला विरोध केला होता आणि पोलिसांनी जप्त केलेल्या कथित सुसाईड नोटचा हवाला दिला होता. तसेच तडवीचा छळ होत असल्याचे दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला होता.