Sena Workers Join Shinde Group: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील 4 हजार शिवसेना कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील सुमारे 4 हजार शिवसेना कार्यकर्त्यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Sena Workers Join Shinde Group: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आज शिंदे गटाकडून मोठा धक्का मिळाला आहे. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघातील सुमारे 4 हजार शिवसेना कार्यकर्त्यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश केला आहे. शहरातील मलबार हिल्स (Malabar Hills) शेजारील 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी सेनेचे कार्यकर्ते शिंदे गटात सामील होण्यासाठी गेले होते.
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेचा दीर्घकाळीन मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्ये संबंध बिघडले आहेत. विशेषत: उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली. त्यातेव्हापासून भाजप आणि शिवसेना जेथ संधी मिळेल, तेथे एकमेकांवर टीक करताना दिसत आहे. (हेही वाचा - Raj Thackeray Post On Gandhi Jayanti: गांधी जयंतीनिमित्त शेअर केलेली राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत, वाचा नेमकं काय म्हणाले ?)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सेनेच्या 39 आमदारांनी जूनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार होण्यास भाग पाडले. या सर्व प्रकारनंतर भाजपने शिंदे यांना सरकार स्थापन करण्यास मदत केली. वास्तविक, आता एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशा दोन गटात शिवसेनेचे विभाजन झाले आहे. अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला पाठींबा दर्शवला आहे. तर काहींनी मात्र, उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही. सध्या पक्ष दोन गटांमधील सत्ता संघर्षात अडकला आहे.
तथापी, आज मुंबईतील वरळी भागातील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अशी ओळख असणारे त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर लवकरच शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चांनाही गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे.