Hanuman Chalisa Row: राणा दाम्पत्याला मोठा दिलासा; न्यायालयाने फेटाळली त्यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका

राणा दाम्पत्याला दिलेला जामीन रद्द करण्यास नकार देताना न्यायालयाने सांगितले की, जामीन रद्द करण्यासाठी "अत्यंत गंभीर" परिस्थिती आवश्यक आहे.

Navneet Rana, Ravi Rana | (Photo Credits: Facebook)

Hanuman Chalisa Row: मुंबईतील एका न्यायालयाने अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (Ravi Rana) यांच्याविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. चौकशीवर परिणाम होत नसेल तर केवळ जामीन अटींचे उल्लंघन करून जामीन रद्द करता येणार नाही. राणा दाम्पत्याला दिलेला जामीन रद्द करण्यास नकार देताना न्यायालयाने सांगितले की, जामीन रद्द करण्यासाठी "अत्यंत गंभीर" परिस्थिती आवश्यक आहे.

खासदार आणि आमदारांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांसाठी विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी 22 ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांनी या दाम्पत्याविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची प्रत शुक्रवारी प्राप्त झाली. (हेही वाचा - Nagapur Crime: पाय लागल्याचे निमित्त, तरुणाला धावत्या ट्रेनमधून फेकले; नागपूर येथील घटना)

महाराष्ट्रातील अमरावती येथील लोकसभा सदस्य नवनीत राणा आणि त्यांचे पती आणि अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील अपक्ष आमदार रवी राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांना 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा आणि विविध समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, या दोघांना 5 मे रोजी विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यातील एक अट अशी होती की, ते या प्रकरणाबाबत मीडियामध्ये वक्तव्ये करणार नाहीत. या अटींचे पालन न केल्यास जामीन रद्द करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif