MPSC Prelims आणि MAH B.Ed. CET 2022 दोन्ही 21 ऑगस्टला; पण दोन्ही परीक्षा देण्याची इच्छा असणार्‍यांसाठी Chandrakant Patil यांनी केली मोठी घोषणा

विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देण्यासाठी तारीख बदलून मिळणार आहे. चंद्रकांत पाटलांच्या या मोठ्या घोषणेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीव भांड्यात पडले आहेत.

Exam Clash | PC: Twitter

महाराष्ट्रात यंदा एमपीएससी (MPSC) आणि बीएड परीक्षेसाठी सीईटी (MAH B.Ed. CET 2022) अशा दोन्ही परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी आयोजित करण्यात आल्या आहेत. दरम्यान या दोन्ही परीक्षा देणार्‍यांना एका परीक्षेवर पाणी सोडावं लागणार का? असा सवाल घोंघावत होता. मात्र राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी यावर तोडगा काढला आहे. आज विधानसभेत बोलताना त्यांनी ज्या परीक्षार्थ्यांना दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत त्यांनी सीईटी सेल सोबतसंपर्क साधावा.

सीईटी सेलमध्ये दोन्ही परीक्षा देणार्‍यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देण्यासाठी तारीख बदलून मिळणार आहे. चंद्रकांत पाटलांच्या या मोठ्या घोषणेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीव भांड्यात पडले आहेत. नक्की वाचा: MPSC Exam Updates: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा, घ्या जाणून .

बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्टपासून 3 दिवस चालणार आहे. एमपीएससी स्टेट सर्विसेस प्रीलिम्स परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी आहे. या परीक्षेची अ‍ॅडमीट कार्ड्स वेबसाईट वर जारी करण्यात आली आहेत. त्यासाठी mpsconline.gov.in ला भेट द्यावी लागेल. प्रीलिम्स नंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी असे 3 टप्पे पार केल्यानंतर विद्यार्थ्यांना अंतिम निकाल पाहता येतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement