Bhiwandi Lok Sabha Election 2024: सुरेश म्हात्रे की कपिल पाटील? भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोण ठरणार विजयी

आरोप प्रत्यारोपामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघ विशेष चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले.राष्ट्रवादीने शरद पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे आणि भाजपाचे कपिल पाटील यांना लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी दिली आहे.

Photo Credit - Facebook

Bhiwandi Lok Sabha Election 2024: आरोप प्रत्यारोपामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघ विशेष चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले.राष्ट्रवादीने शरद पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) आणि भाजपाचे कपिल पाटील (Kapil Patil) यांना लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी दिली आहे.केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. काल एक्झिट पोलचे अंदाज आले आता ४ जूनला निकाल लागणार आहे. यात कपिल पाटील हॅट्रिक करणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सुरेश म्हात्रे यांच्या पराभवाची शक्यता आहे.

कपिल पाटील-

कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर गावाचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे. 2014 मध्ये पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि सलग दोन वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदही भूषवलं.

कोण आहेत सुरेश म्हात्रे-

सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा ग्रामीण राजकारणातील एक महत्वाचं नाव आहे. सुरेश म्हात्रे मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. जनतेच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सर्वप्रथम शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करत समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात चांगला जम बसवला.