Bharat Gogawale Controversial Statement: अदिती तटकरे यांचे नाव येताच भरत गोगावले यांचे वादग्रस्त विधान; सत्तेची नशा की अतिउत्साही पणा? नागरिकांमध्ये चर्चा

तशा चर्चा प्रसारमाध्यम आणि राजकीय वर्तुळातही सुरु आहेत. या विस्तारात महाडचे आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते अशीही चर्चा आहे. दरम्यान, या चर्चा सुरु असतानाच गोगावले यांनी विद्यमान मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचे नाव येताच महिलांविषयी वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे

Bharatshet Gogawale | (File Image)

Bharat Gogawale On Gender Equality: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होऊ घातला आहे. तशा चर्चा प्रसारमाध्यम आणि राजकीय वर्तुळातही सुरु आहेत. या विस्तारात महाडचे आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते अशीही चर्चा आहे. दरम्यान, या चर्चा सुरु असतानाच गोगावले यांनी विद्यमान मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचे नाव येताच महिलांविषयी वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रीपद मिळण्यापूर्वीच त्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेली की की त्यांनी अतीउत्साहात असे विधान केले? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

आमदार भरत गोगावले हे शिंदे गटात गेल्यानंतर सत्तेत आल्यापासूनच मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. इतकेच नव्हे तर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी ते सुरुवातीपासूनच गुढग्याला बाशिंग बांधून बसले आहेत. प्रत्येक वेळी ते रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा सांगत आहेत. आपल्याला रायगडमधील सहा आमदारांचा पाठींबा असल्याचेही ते म्हणत असले तरी अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने त्यांना एक स्पर्धक तयार झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अचानक अदिती तटकरे यांच्याही नावाची चर्चा होऊ लागली आहे. भरत गोगावले यांन याबाबत विचारले असता, त्यांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून आम्ही काम करु शकणार नाही काय? मी त्यांच्या पेक्षा (अदिती तटकरे) अधिक चांगले काम करेन. शेवटी महिला आणि पुरुष यांच्यात फरक असतोच ना, असे विधान केले. (हेही वाचा, Bharat Gogawale On Sanjay Raut: भरत गोगावलेंची जीभ घसरली, म्हणाले "तो साप संजय राऊतांच्या तोंडाला चावायला हवा होता")

मंत्री होण्याची अभिलाषा ठेवणाऱ्या मनुष्याने आजच्या स्त्री-पुरुष भेद जवळपास संपल्याच्या काळात असे विधान करणे आश्चर्याचे मानले जात आहे. भरत गोगावले यांनी मंत्रीपदासाठी नाव चर्चेत असताना अचानकच असे वादग्रस्त विधान केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. आपण त्यांच्यापेक्षा (अदिती तटकरे) अनुभवाने मोठे आहोत. पाठिमागील पंधरा वर्षांचा आपणास अनुभव आहे. त्यामुळे आपण चांगले काम करु शकतो. शिवाय रायगडमधील सहा आमदारांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे. त्यामुळे काही झाले तरी गोगावले रायगडचे पालकमंत्रीपदावरील दावा सोडायला तयार नसल्याचे दिसते. मात्र, त्यांच्या विधानामुळे भलतीच चर्चा सुरु झाली आहे.