Bhandhara Shcoker: वीज तारांमध्ये अडकून एकाचा मृत्यू;भंडाऱ्यातील दुर्घटना

भंडाऱ्यात एका तरुणाचा वीज तारांमध्ये अडकून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Electric Shock | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Bhandhara Shcoker: भंडाऱ्यात एका तरुणाचा वीज तारांमध्ये अडकून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जंगलाच्या परिसरात लावण्यात आलेल्या शिकारीसाठी वीज तारांना स्पर्श झाल्याने त्यात अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील खापा दवडीपार जंगलात घडली. अमोल शंकर आडे( वय वर्ष 27 )असं मृत तरुणाचे नाव आहे. अमोल शिकारीसाठी खापा येथे गेला असताना ही घटना घडली. (हेही वाचा- फ्रीजचा शॉक लागून 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नाशिक मधील धक्कादायक घटना )

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल आडे हा अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीतील वाकेश्वर या गावातील रहिवासी आहे. अमोल याची सासूरवाडी खापा येथे आहे, एकदिवसापूर्वीच अमोल सासूरवाडीत गेला होता. जात असताना त्याचा वीजांच्या तारांना स्पर्श झाला असावा आणि यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमोल याचा मृतदेह जंगलातून जाणाऱ्या ११ हजार केव्हीच्या तारांच्या खाली आढळून आला. काही शिकांऱ्यांनी शिकारीसाठी आकडा टाकला होता.तारांच्या संपर्कामुळे अमोलचा मृत्यू झाला असावा अशी चर्चा गावात सुरु आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता अमोलचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अमोलचा नेमका मृत्यू कशाने झाला आहे अद्याप अस्पष्ट आहे त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे. या घटनेनंतर अडाळ गावात एकच खळबळ उडाली आहे. अमोलच्या मृत्यूमुळे गावात शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे.