पंतप्रधान मदत निधीचा बनावट UPI -ID तयार करून सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा; सायबर क्राईम पोलिसांनी जाहीर केली Fake वेबसाईटची यादी
सायबर गुन्हेगार नागरिकांच्या बँक अकाउंटवरील पैसे तसेच कॉम्पुटर (Computer) किंवा मोबाईल (Mobile) मधील महत्वाचा डाटा (Data) चोरी करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही वेबसाईटच्या आमिषाला बळी न पडता इंटरनेटचा (Internet) सुरक्षित वापर करावा, असं आवाहन सिंधुदुर्ग पोलिसांनी (Sindhudurg Police) केलं आहे.
पंतप्रधान मदत निधीचा बनावट UPI -ID तयार करून सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. सायबर गुन्हेगार नागरिकांच्या बँक अकाउंटवरील पैसे तसेच कॉम्पुटर (Computer) किंवा मोबाईल (Mobile) मधील महत्वाचा डाटा (Data) चोरी करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही वेबसाईटच्या आमिषाला बळी न पडता इंटरनेटचा (Internet) सुरक्षित वापर करावा, असं आवाहन सिंधुदुर्ग पोलिसांनी (Sindhudurg Police) केलं आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन पाळण्यात येत असून नागरिकांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सुचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात सायबर गुन्हेगारांनीही घरूनचं काम करण्यास सुरुवात केली आहे. सायबर गुन्हेगारांकडून पंतप्रधान मदत निधीचा बनावट यूपीआय आयडी बनविण्यासह नागरिकांना सोशल मीडियाद्वारे गंडा घालण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सायबर क्राईम पोलिसांनी नागरिकांना केले आहे. (हेही वाचा - आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे ग्रुप सदस्य, ऍडमिन्स, निर्माते यांच्यावर माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत 'या' कलमाप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल; ठाणे पोलिसांचा नागरिकांना इशारा)
सोशल मीडियावरील विश्वेश कुमार झा यांनी सायबर पोलिसांना या गुन्ह्यासंदर्भात तक्रार केली आहे. झा यांनी सांगितल्याप्रमाणे सायबर चोरट्यांनी बनावट यूपीआय आयडी तयार केला असून याद्वारे ते दात्यांकडील निधी आपल्या खात्यात जमा करत आहेत. पोलिसांनी हा फेक यूपीआय आयडी ब्लॉक केला आहे. सायबर पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू आहे.
या वेबसाईटपासून राहा सावधान
coronavirusaware.xyz
corona-virus.healthcare
survivecoronavirus.org
vaccine-coronavirus.com
coronavirus.cc
bestcoronavirusprotect.tk
coronavirusupdate.tk
coronavirusstatus.space
coronavirus-map.com
blogcoronacl.canalcero.digital
coronavirus.zone
coronavirus-realtime.com
coronavirus.app
bgvfr.coronavirusaware.xyz
याशिवाय या गुन्हेगारांकडून स्पायमॅक्स, कोरोना लाईव्ह या अॅपद्वारे मालवेअर पसरविण्यात येत आहे. ही लिंक उघडणाऱ्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा सर्व डेटा चोरण्यात येते आहे. तसेच, फोनपे, अॅमेझॉन, गुगल पे अशा विविध ऑनलाईन सुविधा देणाऱ्या अॅप्सलाही चोरट्यांनी लक्ष्य केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा वेबसाईटपासून सतर्क राहावे, असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.