BEST Decision On Mumbai AQI: मुंबई शहरातील हवेच्या ढासळेल्या गुणवत्तेवर शुद्धीकरणाचा उतारा; 'बेस्ट' निर्णय

मुंबई शहरातील ढासळलेली हवेची गुणवत्ता (Mumbai AQI) हा केवळ नागरिकच नव्हेत शासन आणि प्रशासन अशा सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. याचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अँड ट्रांसपोर्ट (BEST ) द्वराएक छान निर्णय घेतला गेला आहे. ज्याचे 'बेस्ट'चा 'बेस्ट' निर्णय म्हणून कौतुकही होत आहे.

BMC-BEST | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई शहरातील ढासळलेली हवेची गुणवत्ता (Mumbai AQI) हा केवळ नागरिकच नव्हेत शासन आणि प्रशासन अशा सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. याचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अँड ट्रांसपोर्ट (BEST ) द्वराएक छान निर्णय घेतला गेला आहे. ज्याचे 'बेस्ट'चा 'बेस्ट' निर्णय म्हणून कौतुकही होत आहे. बेस्टने घेतलेल्या निर्णानुसार आता बेस्ट बसमध्ये (Best Bus) एक यंत्र बसविण्यात येईल. जे बेस्टमधून बाहेर पडणारा धूर शुद्धीकरण प्रक्रिया राबवूनच बाहेर सोडला जाईल. प्राप्त माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 350 बस गाड्यांना हे यंत्र बसविण्यात येईल. त्यानंतर पुढच्या काही काळातच हे यंत्र सर्व बस गाड्यांमध्ये बसविण्यात येईल.

पाठिमागील काही दिवसांपासून मुंबई शहरात झालेली प्रदूषणवाढ हा मोठा चिंतेचा विषय ठरला होता. आजवर हवेच्या गुणवत्ता घसरणीत राजधानी दिल्ली शहराचे नाव घेतले जायचे. पण, आता दिल्लीच्या रांगेत मुंबई आणि पुणे शहराचेही नाव घेतले जाऊ लागले आहे. वाढत्या प्रदुषणावरुन मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या मुंबई महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. मुंबई शहरातील प्रदुषणात वाहनांमधून बाहेर पडणारा धूर हेसुद्धा एक प्रमुख कारण मानले जात आहे. त्यामुळे या वहनांना 'व्हेइकल माऊंटेड फिल्टर' बसविण्यात येणार आहे. 'बेस्ट' उपक्रमांच्या माध्मातून याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

मुंबई शहरामध्ये प्रदूषण वाढीमध्ये केवळ वाहनांचा धूरच कारणीभूत नाही तर त्यासोबतच इतरही अनेक घटक कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. ज्यामध्ये शहरभर सुरु असलेली अधिकृत, अनधिकृत खासगी आणि सार्वजनिक बांधकामे. देखभाल आणि दुरुस्थीच्या नावाखाली सुरु असलेली इमारतींची कामे. याशिवाय शहरामध्ये अनेक बेकऱ्या आणि भट्ट्या आहेत. या भट्टांमध्ये उर्जानिर्मितीसाठी खरेतर लाकूड वापरावे लागते. मात्र, लाकूड महाग असल्याने तुलनेत कमी प्रतिचे प्लायवूड वापरले जाते. ज्यामुळे होणारे प्रदुषण अधिक मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे या भट्ट्यांच्या चिमण्या धूर ओकताना मोठ्या प्रमाणावर विषारी द्रव्ये बाहेर सोडतात. आगामी काळात या बेकऱ्यांना चिमण्यांची उंची वाढविण्यासोबतच इतरही उपाययोजना करण्यास सांगितले जाईल, असेही दीपक केसरकर म्हणाले. दरम्यान, मुंबई शहरातील वायूप्रदूषण रोखण्यासाठी बीएमसीने मार्गदर्शक तत्वे नुकतीच जारी केली आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now