BEST कडून कुर्ला पश्चिम ते वांद्रे पूर्व स्टेशन मार्गावर एसी डबल डेकर बस सुरू
बेस्टने 56 रुपये प्रति किमी या दराने बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत आणि पहिल्या दिवसापासून सुमारे 75 रुपये / किमीच्या उत्पन्नासह नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
BEST कडून आता कुर्ला पश्चिम ते वांद्रे पूर्व स्टेशन (Kurla West-Bandra East Station) मार्गावर एसी डबलडेकर बस (AC Double Decker Bus) सुरू करण्यात आली आहे. मुंबईत दक्षिण मुंबई मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रिक बस सुरू केल्यानंतर आता ही सेवा कुर्ला-वांद्रे भागातही सुरू करण्यात आली आहे. यामुळे बीकेसी भागात कामावर जाणार्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कुर्ला ते बीकेसी भागात प्रवासासाठी शेअर रिक्षा चालक अनेकदा 50 रूपये सीट असा वाढीव दर आकारत प्रवाशांची लूट करत असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. त्यामुळे या रोजच्या कटकटीमधून अनेकांना आराम मिळणार आहे.
रूट नंबर 310 वर 10 एसी डबल डेकर बस धावणार आहेत. सध्या बेस्टच्या ताफ्यात 49 एसी डबल डेकर बस आहेत. त्यामध्ये दक्षिण मुंबई मध्ये दोन रूट वर फेब्रुवारी 21 पासून बससेवा सुरू करण्यात आली आहे. Switch Mobility कडून या बस घेण्यात आल्या आहेत. दीड ते 3 तासांच्या चार्जिंग मध्ये ही बस सुमारे 250 किमीचा प्रवास करू शकते. 65 प्रवाशांची क्षमता असलेली ही बस किमान 6 रूपये तिकीट आकारते. पहिल्या 5 किमी अंतरासाठी 6 रूपये तिकीट आहे.
बेस्टने 56 रुपये प्रति किमी या दराने बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत आणि पहिल्या दिवसापासून सुमारे 75 रुपये / किमीच्या उत्पन्नासह नफा मिळण्याची अपेक्षा आहे. BEST Decision On Mumbai AQI: मुंबई शहरातील हवेच्या ढासळेल्या गुणवत्तेवर शुद्धीकरणाचा उतारा; 'बेस्ट' निर्णय .
टाटा पॉवरने FY24 च्या Q2 मध्ये 11,529 नवीन EV होम चार्जर सुरू केले आहेत, ज्यामुळे एकूण संख्या 62,000 झाली आहे. कंपनीने 180 ई-बस चार्जिंग पॉइंट देखील तैनात केले आहेत. त्यांची फ्लीट चार्जिंग उपस्थिती 700 चार्जिंग पॉईंट्सच्या पुढे विस्तारली आहे. टाटा पॉवरचे उद्दिष्ट इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील विकसित होत असलेल्या गरजांसाठी सर्वसमावेशक उपाय प्रदान करणे आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)