बीड: मोटरमनच्या जागेवर बसून मनोरुग्णाकडून रेल्वे सुरु करण्याचा प्रयत्न, प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला

या प्रकारमुळे रेल्वेतील हजारो प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.

Representational Image (Photo Credits: PTI)

बीड (Beed) येथील एका मनोरुग्णाने मोटरमनची जागा घेत रेल्वे सुरु करण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकारमुळे रेल्वेतील हजारो प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे पुढे होणारा अनर्थ टळला आहे.

परळी-अकोला रेल्वेत हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. मनोरुग्ण हा जवळजवळ 40 मिनिटे मोटरमनच्या जागेवर बसून होता. तेव्हा त्याने रेल्वे सुरु करण्याचासुद्धा प्रयत्न केला. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु जवळजवळ अर्धा तासानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनोरुग्णाला तेथून बाहेर काढले.

(हमालांच्या मनमानी शुल्क आकारण्याला बसणार चोप, मोबाईल अॅपवरुन करता येणार हमालांचे ऑनलाईन बुकिंग)

मात्र मनोरुग्ण मोटरमनच असल्याचे प्रवाशांना वाटले. त्यामुळे कोणीही काही बोलले नसून त्याच्या वेड्यावाकड्या हालचालींवरुन तो मनोरुग्ण असल्याची बाब समोर आली. तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी याबद्दल प्रशासनाला माहिती दिल्यावर या प्रकाराचा गुंता सोडण्यासाठी पुढे आलेय