Beed Cyber Crime: दुप्पट पैशांचं आमिश दाखवत भाच्याने मामाला लावला 70 लाखांचा चुना, बीडमधील घटना

यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Beed Cyber Crime: जास्त पैसे कमवण्याच्या नादात अनेक जण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत पैसे कमवतात याच कधी कधी लोकांची फसवणूक होते. लाख रुपये तर कधी करोडो रुपयांची फसवणूक होत असते. वाढत्या तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. दरम्यान बीड शहरात भाच्याने आपल्या मामाला पैशांचा गंडा लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेअर मार्केटमध्ये दुप्पच पैसे मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. भाच्याने त्याच पैशाने गोव्यात मौजमज्जा केली

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये मामाला 70 लाख रुपयांचा चुना लावून भाचा गोव्याला फिरायला गेल्याची माहिती समोर आली आहे. भाच्याने मामाला शेअर मार्केटमध्ये दुप्पट पैसे मिळतात याचं आमिष दाखवलं आणि मामाकडून 70 लाख रुपये घेतले. त्यानंतर मामाची फसवणूक करून भाचा गोव्याला फिरायला गेला. या प्रकरणी बीड शहारत पीडित व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटकही केली आहे. सय्यद तलहा, सय्यद जमाल आणि यश गायकवाड यांच्यासह आणखी एकाला पोलिसांनी अटक केले आहे. (हेही वाचा- केवळ निष्काळजीपणा! पुण्यातील महिलेला 7.5 लाखांचा गंडा, कपाट विक्री अंगाशी)

अश्या प्रकारे केली फसवणूक

बीडमध्ये व्यापारी शेख इसाक शेख महमूज यांचा टुर्स अॅंड ट्रव्हल्सचा व्यवसाय आहे. तलहा सय्यद हा त्याचा नातेवाईक आहे. तलहाने मामाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी विनंती केली. रक्कम दुप्पच होईल अशी आश्वासन दिली. पैशांच आमिष दाखवत शेख इशाक यांनी विश्वास ठेवत पैसे दिले. जुलै २०२२ मध्ये ऑनलाईन माध्यमातून १५ लाख रुपये दिले. त्यानंतर उसने घेऊन ५५ लाख रोख रक्कम दिली. मात्र आरोपीने याचा गैरफायदा घेत पैसे उडवण्यासाठी गोव्याला गेला. गोव्याला गर्लफ्रेडला देखील घेऊन गेला आणि त्याचा सोबत तीन मित्र आणखी होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आरोपींना ताब्यात घेतले.