मुंबई: बोरीवली, मालाड सांताक्रूज रेल्वे स्टेशन्स चे पालटले रुप, स्थानकांवर रेखाटण्यात आली सुंदर चित्रे, See Pics
तत्पूर्वी कोरोनामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांच्या चेह-यावर प्रसन्नता आणण्यासाठी भारतीय रेल्वेने सुंदर उपक्रम राबविला आहे. ज्यात मुंबईतील रेल्वे स्थानकांची डागडुजी करण्यात येणार आहे. यात बोरीवली, मालाड, सांताक्रूज रेल्वे स्थानकांमध्ये सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहे.
आपला देश, आपला आसपासचा परिसर स्वच्छ असावा असं कोणाला वाटतं नाही. मात्र त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करणे गरजेचे आहे. इतरत्र कचरा टाकणे, थुंकणे यांसारख्या गोष्टी टाळल्या पाहिजे. अस्वच्छ परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. त्यातच देश आता कोरोना व्हायरस सारख्या मोठ्या विषाणूशी लढा देत आहे. यात महाराष्ट्र काही अंशी सफल होताना दिसत असतो अनलॉकच्या टप्प्यात हळूहळू एक एक गोष्टी सुरळीत होताना दिसत आहे. त्यात मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा (Mumbai Local) देखील हळूहळू पूर्वपदावर येत आहे. चाकरमानी पुन्हा एकदा रेल्वेने प्रवासाला सुरुवात करतील. तत्पूर्वी कोरोनामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांच्या चेह-यावर प्रसन्नता आणण्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railway) सुंदर उपक्रम राबविला आहे. ज्यात मुंबईतील रेल्वे स्थानकांची डागडुजी करण्यात येणार आहे. यात बोरीवली (Borivali), मालाड (Malad), सांताक्रूज रेल्वे स्थानकांमध्ये (Santacruz) सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेने सुरु केलेल्या या उपक्रमात अनेक रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. ही प्रक्रिया सुरु असून बोरीवली, मालाड आणि सांताक्रूज रेल्वे स्थानकात रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. या स्थानकांतील भिंतीवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. यात वारली पेटिंग, मोर अशा अनेक चित्रांचा समावेश आहे. हेदेखील वाचा- Colour-Coded E-Pass: मुंबई लोकल मध्ये गर्दीचं नियोजन करण्यासाठी 'कलर कोडेड ई पास' यंत्रणेचा होतोय विचार; जाणून घ्या काय आहे हा पर्याय!
रेल्वे फलाटांसह रेल्वे पुलावर देखील ही चित्रे रेखाटण्यात आली आहेत. या सुंदर आणि मनमोहक चित्रांमुळे या रेल्वे स्थानकांचे रुपडे पूर्णपणे पालटले आहे. हा उपक्रम अनेक मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांमध्ये राबविण्यात येणार आहे.
दरम्यान सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबई लोकल सेवा आता सर्व महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. यासाठी वेळ निश्चित करण्यासाठी आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 नंतर महिलांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे.