बारामती: माहेरहून सोने आणले नाही म्हणून सूनेची हत्या, सासरच्या घरासमोर घरातल्यांनी केले अंतिमसंस्कार
महिलेच्या माहेरच्यांनी असा आरोप लावला आहे की, त्यांच्या मुलीवर नेहमीच हुंडा घेऊन येण्यासाठी दबाव टाकला जात होता.
महाराष्ट्रातील बारामती (Baramati) येथील सांगवी गावात हुंडा न दिल्याने एका सूनेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या माहेरच्यांनी असा आरोप लावला आहे की, त्यांच्या मुलीवर नेहमीच हुंडा घेऊन येण्यासाठी दबाव टाकला जात होता. मात्र त्यांना हुंडा दिला नाही म्हणून तिला विष देऊन मारुन टाकले. आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचे घरातल्यांना कळताच त्यांनी सासरच्या घरासमोरच तिच्यावर अंतिमसंस्कार केले. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Mumbai: नपुंसकाकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या व्यक्तीची 6 जणांकडून हत्या; आरोपींना अटक)
गीतांजली असे महिलेचे नाव असून तिचा विवाह अभिषेक तावरे नावाच्या मुलासोबत एका वर्षापूर्वी झाला होता. 24 मे रोजी त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. त्याच्या काही दिवसानंतर गीतांजली हिच्या नातेवाईकांना फोन करत असे सांगण्यात आले की, तिने विष खाऊन आपले आयुष्य संपवले आहे. गीतांजली हिला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पुढील तपासासाठी पुण्यातील एका रुग्णालयात हलवण्यात आले. पण गुरुवारी सकाळी 8 वाजता तिचा मृत्यू झाला.
पीडित महिलेची आत्या नमिदा यादव यांनी सासऱ्यांवर गंभीर आरोप लावले. त्यांनी आजतक सोबत बोलताना असे म्हटले की, लग्नात गीतांजली हिला 51 तोळे सोने देण्याची मागणी सासऱ्यांची केली होती. परंतु घरातील परिस्थिती थोडी बिकट असल्याने त्यांना ती मागणी पूर्ण करता आली नाही.
लग्नानंतक काही महिन्यांनी गीतांजली हिच्या सासरच्या मंडळींनी तिला माहेरहून सोने आणि कपडे घेऊन येण्यासाठी मारहाण करण्यास सुरुवात केली. परिस्थिती बिकट होती तरीही त्यांनी सासऱ्यांचा 25 तोळे सोने दिले होते. परंतु तरीही सासरच्यांचे मन भरले नाही. तिने पुढे म्हटले की, सोने घेऊन येण्यासाठी गीतांजली हिला मारहाण केली जात होती. त्यामुळे नाराज होत गीतांजली माहेरी निघून आली. परंतु नातेवाईकांनी तिची समजूत घालत तिला पुन्हा सासरी पाठवले.(Cruelty with Animals: शस्त्र खुपसून कुत्र्याचे डोळे फोडले; पुणे येथील सांगवी परिसरात विकृत कृत्य)
लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या कारणास्तव केक कापल्यानंतर गीतांजली हिला तिच्या नवऱ्यासह सासरच्या मंडळींनी मारहाण केली आणि तिला विष देऊन मारले. या प्रकारानंतर माहेरच्यांनी अंतिम संस्कार तिच्या सासरच्या घरासमोरच करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गावात तणाव वाढला. 100 हून अधिक पोलीस कर्मचारी त्यावेळी तैनात करण्यात आले होते.