Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामती विधानसभा साठी युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची मागणी; कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवारांची गोविंदबागेत भेट!

विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत. शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय आहेत.

Yugendra Pawar | Insta

बारामती लोकसभेमध्ये शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरात नणंद विरूद्ध भावजय संघर्ष झाल्यानंतर आता विधानसभेमध्ये काका विरूद्ध पुतण्या असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. लोकसभा निकालानंतर पहिल्यांदा बारामती मध्ये आलेल्या शरद पवारांना भेटायला आलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभेमध्ये युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना बारामती मधून तिकीट द्यावं अशी मागणी केली. 'आम्हाला बारामतीचा दादा' बदलायचा आहे' असं म्हटल्यावर एकच हशा पिकला. शरद पवारांनी अद्याप त्यावर कोणतेही थेट आश्वासन कार्यकर्त्यांना दिलेले नाही.   सध्या शरद पवार 11,12,13 जून बारामती मध्ये आहेत सध्या ते लोकसभेमध्ये मेहनत घेतलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. गोविंदबागेत त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी रीघ लावली आहे.

युगेंद्र पवार देखील बारामती मध्ये कार्यकर्त्यांना विना अपॉईंटमें भेटण्यासाठी दर मंगळवारी दाखल असतात. पवार कुटुंब आणि एनसीपी पार्टी मध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचा परिवार शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभा राहिला. त्यांनी लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्याऐवजी सुप्रिया सुळेंचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पहिल्यांदाच युगेंद्र पवार चर्चेमध्ये आले.

युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत. शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय आहेत. फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवार पाहतात. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे युगेंद्र पवार अध्यक्ष होते. मात्र लोकसभा निवडणूक निकालानंतर त्यांना या पदावरून दूर हटवले आहे. युगेंद्र पवार यांना Ajit Pawar यांच्या कार्यकर्त्यांकडून घेराव; व्हिडिओ व्हायरल .

लोकसभा निवडणूकीत आत्या सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना दिसलेले युगेंद्र आता राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होणार का? हे पाहणं उत्सुकतेचे आहे. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठी देखील बारामतीमधील निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. अजित पवार हे बारामतीचे विद्यमान आमदार आहेत.