IPL Auction 2025 Live

Baramati Lok Sabha Elecion 2024: बारामतीत नणंद विरूद्ध भावजय लढत; मतमोजणीला सुरूवात होताच सुप्रिया सुळे पिछाडीवर , अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला

नात्याने नणंद-भावजय असल्याने या मतदार संघाकडे देशभरातील राजकीय नेत्यांच लक्ष लागलं आहे.

Supriya Sule And Sunetra Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Baramati  Lok Sabha Elecion 2024: बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha Election 2024) नणंद विरूद्ध भावजयची लढत पहाला मिळत आहे. एकदम काँटे की टक्कर असणार आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule)या विद्यमान खासदार म्हणून सलग तीन वेळा बारामतीतून निवडून आल्या आहेत. मात्र अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर त्यांच्याविरूद्ध घरातीलच उमेदवार म्हणजेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं (Sunetra Pawar)आव्हान असणार आहे. बारामती मतदार संघाकडे राज्याचेच नाहीतर देशाचं लक्ष लागलेलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत सुप्रिया सुळे. त्यांचा सामना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत होत आहे. नणंद विरूद्ध भावजयमधील लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 4 जूनला सर्वंची उत्सूकता संपेल. (हेही वाचा:Thane Lok Sabha Election 2024: शिंदेंच्या बालेकिल्लावर ठाकरेंचा झेंडा फडकणार? ठाण्यात राजन विचारेंचे पारडे जड; नरेश म्हस्केंपुढे कडवे आव्हान, निकाल अवघ्या काही तासांवर )

सुप्रिया सुळे-

सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. 2009 मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. सामाजिक सेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना ऑल लेडीज लीगतर्फे मुंबई महिला ऑफ द डिकेड अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.बारामतीत 53.08 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांनी विजयासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या 2009पासून खासदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी रासपचे उमेदवार महादेव जानकर यांचा पराभव केला होता. सुप्रिया सुळे यांना 5,21,562 तर महादेव जानकर यांना 4,51,843 इतकी मतं पडली होती. 2029 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला होता. सुप्रिया सुळे यांना 6,86,714 तर कांचन कुल यांना 5,30,940 इतकी मतं मिळाली होती.

सुनेत्रा पवार-

सुनेत्रा पवार यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1963 मध्ये धाराशिवमधील तेर या गावामध्ये झालाय. सुनेत्रा पवार यांच्या वडिलांचं नाव बाजीराव भगवंतराव पाटील तर आईचे नाव दौपदी बाजीराव पाटील आहे. सुनेत्रा पवारांचं शिक्षण बी. कॉम झालं असून व्यवसाय हा शेती आहे. सुनेत्रा पवारांना वाचन, निसर्ग फोटोग्राफी, चित्रकला आणि समाजकार्यामध्ये विशेष आवड आहे.

सुनेत्र पवार या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, बारामती, एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीया (एनजीओ) बारामतीच्या अध्यक्ष आहेत. त्यासोबतच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्य माजी सदस्या, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काहाटी, बारामती क्लबच्याही विश्वस्त आहेत.

सुनेत्रा पवार यांना उल्लेखनीय कार्याबद्दल चिंचवड देवस्थान तर्फे ‘श्रीमत् महासाधू श्रीमोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार 2021’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार 2023’ आणि ‘ग्रीन वॉरीयर पुरस्कार पुणे. लोकमत तर्फे ‘आऊटस्टँडींग वुमन अॅवार्ड’ आणि ‘लोकमत आयकॉन पुरस्कार, पुणे. तर ग्रामीण भागात जागरूकता निर्माण केल्याबद्दल ईटी जेन नेक्स्ट आयकॉन्स पुरस्कार आणि राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार 2024 असे पुरस्कार मिळाले आहेत.