Bandra Railway Station Stampede: मुंबई येथील वांद्रे रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 8 प्रवासी गंभीर जखमीच गोरखपूर एक्सप्रेसमध्ये चढताना घटना
या चेंगराचेंगरीत आतापर्यंत आठ ते नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे.
मुंबई येथील वांद्रे रेल्वे स्थानक ( Bandra Railway Station) फलाटावर प्रवाशांवर मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी (Bandra Railway Station Stampede) झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत आठ ते नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्यांच्यावर होमी भाभा रुग्णालयात (Homi Bhabha Hospita) उपचार सुरु असल्याचे समजते. वांद्रे ते गोरखपूर एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवाशांमध्ये झलेल्या गर्दीमुळे (Stampede) ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. धक्कादायक म्हणजे पश्चिम रेल्वेने मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. आज सकाळी सहा वाजनेच्या सुमारास ही घटना घडली. दिवाळी (Diwali 2024)आणि छटपूजा (Chhath Pooja) सण जवळ आला असल्याने उत्तर भारतीय प्रवासी मोठ्या प्रमाणावर रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते.
वांद्रे ते गोरखपूर एक्सप्रेस पकडताना चेंगराचेंगरी
दिवाळी आणि छटपुजा सणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावी जाण्यासाठी उत्तर भारती प्रवासी वांद्रे रेल्वे स्थानक फलाट आणि परिसरावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. दरवर्शीचा विचार करता रेल्वे प्रशासन सतर्क असते. प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेता प्रशासन रेल्वे पोलीसांची एक कुमक तैनात करत असते. हे पोलीस प्रवाशांची रांग लावतात. ज्यामुळे ट्रेनमध्ये चढताना प्रवासांमध्ये स्पर्धा किंवा इतर कोणता अनुचीत प्रकार घडत नाही. यंदाच्या वर्षी मात्र, रेल्वे प्रशासनाने अशी कोणतीच खबरदारी घेतली नव्हती. त्यात वांद्रे ते गोरखपूर एक्सप्रेस ही अनारक्षीत रेल्वे होती. या ट्रेनने प्रवास करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची आवश्यकता नव्हती. परिणामी तत्काळ किंवा नियमीत तिकीट काढून या बसने प्रवास करण्यास अनेक प्रवाशांनी प्राधान्य दिले. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर प्रवासी फलाटावर पोहोचले आणि ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात मोठी चेंगराचेंगरी झाली. (हेही वाचा, Bandra Railway Station च्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम जानेवारीपर्यंत होणार पूर्ण, पश्चिम रेल्वेची माहिती)
प्रवाशांच्या अधिक गर्दीमुळे अप्रिय घटना
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर याची प्रतिक्रिया
वांद्रे रेल्वे स्थानक चेंगराचेंगरीची घटना पुढे येताच मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रेल्वे प्रशासन आणि राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिवाळी आणि छटपूजेसाठी उत्तरभारतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर गावी जातात. अशा वेळी, रेल्वे प्रशासनाने आणि राज्य व केंद्र सरकारने योग्य प्रमाणावर नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, तशी कोणतीह खबरदारी संबंधीत यंत्रणांनी घेतली नाही. हा सर्वात मोठा हालगर्जीपणा आहे. दुसऱ्या बाजूला नागरिकांनी सुद्धा प्रवास करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. उगाचच चुकीच्या पद्धीने प्रवास करत गर्दीमध्ये स्व:ताला झोकून देऊ नये. त्यामुळे नको तो अनर्थ घडतो. निष्पाप लोकांच्या जीवावर बेतते, असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.