Bandra Incident: वांद्रे स्थानकातील गर्दी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वृत्तवाहिनेच्या पत्रकाराला मुंबई कोर्टाकडून जामीन
त्यामुळे अत्यावश्यक सेवासुविधा पूर्वीसारख्याच सुरु राहणार आहेत. मात्र रेल्वेसेवा 3 मे पर्यंत पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. तरीही 14 एप्रिलला वांद्रे पश्चिमेला रेल्वे स्थानकाच्या बाहेर बहुसंख्येने विविध समुदायातील नागरिकांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवासुविधा पूर्वीसारख्याच सुरु राहणार आहेत. मात्र रेल्वेसेवा 3 मे पर्यंत पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. तरीही 14 एप्रिलला वांद्रे पश्चिमेला रेल्वे स्थानकाच्या बाहेर बहुसंख्येने विविध समुदायातील नागरिकांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. तसेच लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन यावेळी करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात आला. ऐवढेच नाही तर सरकारवर सुद्धा विरोधकांनी टीका केली. याच दरम्यान, एका टीव्ही वृत्तवाहिनीचे पत्रकार यांनी चुकीची माहिती दिल्याचे सांगत त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच आज त्यांना कोर्टात सादर करण्यात आले. या प्रकरणी सुनावणी होत पत्रकार राहुल कुलकर्णी यांना मुंबई कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
राहुल कुलकर्णी यांनी रेल्ले सेवा सुरु होणार असल्याची चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. यामुळेच वांद्रे स्थानकात गर्दी झाल्याचे ही बोलले जात होते. या प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच वांद्रे स्थानकातील गर्दी प्रकरणी 3 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामधील एक आरोपी विनय दुबे याला अटक करण्यात आली असून येत्या 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.(Bandra Incident: वांद्रे स्थानकातील गर्दी प्रकरणी 9 जणांना अटक, 19 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी)
दरम्यान, दिवसेंदिवस कोरोनाच वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाउनचे आदेश कठोर केले जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला वांद्रे स्थानकातील गर्दीचे वातावरण पाहता संताप व्यक्त करण्यात आला. बहुसंख्येने जमलेल्या उत्तर भारतीयांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार सु्द्धा करण्यात आला. या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.