Bal Thackeray Birth Anniversary: बाळ ठाकरे यांच्या जयंती निमित्त पहा त्यांचे खास फोटोज आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातील काही गोष्टी (View Pics)

त्यानिमित्त जरा मागे वळून पाहुया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी!

Bal Thackeray| Photo Credits: instagram.com/balasaheb_thackeray__/

Balasaheb Thackeray Jayanti 2021:  बाळ केशव ठाकरे (Bal Thackeray) ते शिवसेना प्रमुख हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे हा प्रवास महाराष्ट्रातील राजकारणामधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 दिवशी पुण्यात झाला. प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई ठाकरे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. बाळ ठाकरे हे दर्दी रसिक, व्यंगचित्रकार, राजकारणी, उत्तम वक्ते होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून ते आजतागायत महाराष्ट्राचं राजकारण हे कायमच 'ठाकरे' घराण्याभोवती होते. बाळ ठाकरेंनी राजकारण आणि समाजकारणाचा वसा त्यांचे वडील प्रबोधकार म्हणजेच केशव सीताराम ठाकरे यांच्या कडून घेतले आहे. 'You Can Love him or hate him but you cannot ignore him' असं राजकीय व्यक्तिमत्त्व असणार्‍या बाळासाहेबंचा जीवनप्रवास काही फोटोंच्या माध्यमातून पाहुया! नक्की वाचा : Balasaheb Thackeray Birth Anniversary: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपिठावर; शरद पवार, देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित.

Bal Thackeray| Photo Credits: Instahram/ balasaheb_thackrey

Bal Thackeray| Photo Credits: instagram.com/balasaheb_thackeray__/

Bal Thackeray With Wife Meenatai| Photo Credits: instagram.com/balasaheb_thackeray__/

Bal Thackeray Family| insatagram/ balasaheb_thackray_/

Bal Thackeray| Photo Credits: instagram.com/balasaheb_thackeray__/

Balasaheb With Indira Gandhi| Photo Credits: insatagram/ balasaheb_thackray_/

 

बाळ ठाकरे आणि क्रिकेटर मियादाद | Photo Credits: insatagram/ balasaheb_thackray_/

Raj Thackeray With Balasaheb| Photo Credits: instagram.com/raj_saheb_thackarey_

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaditya Thackeray (@adityathackeray)

मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळ ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 साली निधन झाले. दरम्यान त्यांच्या हृद्यावर काही शस्त्रक्रिया झाल्या होत्या. वयोमानानुसार थकलेल्या बाळासाहेबांनी हळूहळू सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.