Bakrid 2020: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बकरी ईद साधेपणाने आणि नियमांचे पालन करून साजरी करावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन
याच पार्श्वभूमीवर यावर्षी बकरी ईद (Bakrid 2020) साधेपणाने आणि नियमांचे पालन करून साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुस्लीम बांधवांना केले आहे.
कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक धार्मिक, सांकृतिक, सामाजिक कार्यक्रमावर निर्बंध लावण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर यावर्षी बकरी ईद (Bakrid 2020) साधेपणाने आणि नियमांचे पालन करून साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुस्लीम बांधवांना केले आहे. मुस्लिम बांधव दरवर्षी बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, यावर्षी संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे यावर्षी हा सण सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करून साजरा करावा लागणार आहे. ज्यामुळे मुस्लिम समाजात नाराजीचे वातावरण पसरले आहे. याआधीही मुस्मिल बांधवांनी रमजान ईदचा सण आपपल्या घरात साजरा करून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले होते. यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मनापासून कौतूकही केले होते.
"सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत आणि आपण त्याला साथ द्यावी असे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे. गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी करावी असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्रात आज 6 हजार 741 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 213 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 67 हजार 665 वर पोहचली आहे. यापैकी 10 हजार 695 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 49 हजार 7 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे देखील वाचा- Bakrid 2020 Date: यंदा बकरी ईद चा सण कधी? जाणून घ्या ईद उल-अजहा ने ओळखल्या जाणार्या या सणाचं महत्त्व
उद्धव ठाकरे यांचे ट्विट-
तसेच, भारतात येत्या 1 ऑगस्ट रोजी बकरी ईदचा सण साजरा केला जाणार आहे. बकरी ईद या सणाला ईद उल जुहा असेही म्हणतात. ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे प्रतीक म्हणून बक-याचा बळी दिला जातो. मात्र, यामागे एकच उद्देश असतो की, प्रत्येक मनुष्याने आपले जीवन हे ईश्वराची देणगी आहे असे समजावे, त्यामुळे त्याची रक्षा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग किंवा बलिदान करण्यासाठी नेहमी तयारी दर्शवली पाहिजे.