महाराष्ट्र: बकरी ईद निमित्त प्रार्थनेसाठी परवानगी द्यावी, मौलाना सईद नुरी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती
त्यामुळे यंदाच्या प्रत्येक सणावर कोरोनाचे सावट असल्याने ते अत्यंत साधेपणाने साजरे करावेत असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या प्रत्येक सणावर कोरोनाचे सावट असल्याने ते अत्यंत साधेपणाने साजरे करावेत असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. याच दरम्यान आता येत्या 31 जुलै रोजी सुरु बकरी ईदचा सण सुद्धा मुस्लिम बांधवांनी साधेपणाने घरीच साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. याच दरम्यान आता रझा अॅकेडमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद निमित्त प्रार्थनेसाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.
मौलाना सईद नुरी यांनी 24 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांना बकरी ईद निमित्त पत्र लिहिले होते. त्यांनी त्यामध्ये ईद निमित्त प्रार्थनेसाठी परवानगी देण्याचे म्हटले होते. तसेच जसे सुप्रीम कोर्टाने रथ यात्रेला परवानगी दिली होती पण त्यावेळी नियम आणि अटी सुद्धा लागू केल्या होत्या. असे ही नुरी यांनी म्हटले आहे. त्यामुळे बकरी ईद सणासह नमाज पठणासाठी थोडी सूट द्यावी असे ही नुरी यांनी म्हटले आहे. तसेच सरकारकडून जे काही नियम आणि अटी लागू केल्या जातील त्याचे पालन करण्यात येईल असे ही सईद नुरी यांनी स्पष्ट केले आहे.(Bakrid 2020 Date: यंदा बकरी ईद चा सण कधी? जाणून घ्या ईद उल-अजहा ने ओळखल्या जाणार्या या सणाचं महत्त्व)
मुस्लिम धर्मीयांसाठी बकरी ईद हा दिवस खास असण्याच अजून एक कारण म्हणजे मक्का या पवित्र स्थळी गेलेल्यांच्या हज यात्रेचा हा अखेरचा दिवस असतो. तसेच रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना आहे. तो संपल्यानंतर सुमारे 70 दिवसांनंतर बकरी ईद साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व असतं. जगभरात बकरी ईदचा हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. भारत, पाकिस्तानामध्ये बकरी ईद असते. जर्मन, फ्रेंच मध्ये ओफ़रफेस्ट म्हणून ओळखला जातो. तुर्की मध्ये कुर्बान बेरामाइ म्हणून ओळखला जातो.