Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उद्धव ठाकरे अयोद्धेला जाणार नाहीत; काळाराम मंदिर, गोदातीरी असं करणार सेलिब्रेशन!

त्यामुळे त्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये ठाकरे गट प्राणप्रतिष्ठा दिवशी आनंदोत्सव साजरा करणार आहेत.

Uddhav Thackeray | (Photo Credit - X)

राम मंदिराच्या उद्घाटनाचा (Ram Mandir Consecration Ceremony) सोहळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 22 जानेवारीला देशातील अनेक मान्यवरांना या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान या निमंत्रणाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजपमध्ये वाद देखील रंगला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी आयोद्धेतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नसल्याचं आता जाहीर केलं आहे. या सोहळ्याऐवजी 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठेचा दिवस आणि 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती या दोन्ही दिवसांचं औचित्य साधत ठाकरे गट नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पूजा आणि गोदावरीच्या तीरावर महाआरतीचं आयोजन करणार आहेत.

प्रभू रामचंद्र काहीकाळ पंचवटीला देखील राहिले होते. त्यामुळे त्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये ठाकरे गट प्राणप्रतिष्ठा दिवशी आनंदोत्सव साजरा करणार आहेत. त्यानंतर 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे. 23 जानेवारीला नाशिक येथे शिवसेनेचे शिबिर होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदानात शिवसेनेची जाहीर सभा होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. Ayodhya Ram Mandir Features: अयोद्धेच्या राम मंदिरात राम दरबार ते सीता कूप कसं असेल? पहा Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Trust ने शेअर केला नजारा .

राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम हा धार्मिक आणि अस्मितेचा असल्याने त्याला राजकीय रंग येऊ नयेत. आम्हाला देखील ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आम्ही रामाच्या दर्शनाला जाऊ मात्र तोपर्यंत मानपानाचा कार्यक्रम बाजूला ठेवायला हवा. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी काल मीनाताईंच्या जयंती निमित्त शिवाजी पार्कात आलेल्या उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले आहे.

नाशिकचं काळाराम मंदिर इतिहास  

नाशिक मध्ये गोदावरी नदीच्या किनारी काळाराम मंदिर आहे. सध्या हे मंदिर जेथे आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहात होते. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती अंतरा-अंतरावर सापडल्या जेथे राममूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड, सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होतं. या मूर्ती स्वंयभू म्हणून ओळखल्या जातात. एका  काळ्या दगडात बांधलेले हे सुंदर मंदिर आहे.