Mumbai: पॉन्झी स्कीममध्ये लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी ऑटोरिक्षा चालकाला अटक; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील 2 कोटींचा फ्लॅट जप्त

या ऑटोचालकाचा गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील (Goregaon-Mulund Link Road) दोन बेडरुमचा 2 कोटी रुपयांचा फ्लॅट सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल अॅसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट (SARFAESI) अंतर्गत जप्त करण्यात आला आहे.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai: लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका ऑटोरिक्षा चालकाला (Autorickshaw Driver) भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. या ऑटोचालकाचा गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील (Goregaon-Mulund Link Road) दोन बेडरुमचा 2 कोटी रुपयांचा फ्लॅट सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल अॅसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट (SARFAESI) अंतर्गत जप्त करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. कोर्ट कमिशनरने सोमवारी ऑटोचालकाचा फ्लॅट जप्त केला.

पंजाब नॅशनल बँकेने हारून सत्तार शेख, त्यांची पत्नी निलोफर शेख आणि दुसरी महिला हलिमा शेख यांनी 2019 मध्ये बँकेकडून 1.8 कोटी रुपयांचे गृहकर्ज घेतल्याचा आरोप केला आहे. (हेही वाचा -Pragya Satav Attack: आमदार प्रज्ञा सातव हल्ला प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसांकडून एकास अटक)

अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट एस्प्लानेड एमआरए शेख यांनी सांगितले की, कर्जदारांनी मान्य केल्याप्रमाणे आर्थिक सहाय्याची परतफेड करण्यात चूक केली आहे आणि त्यांचे खाते 2020 मध्ये नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. उपरोक्त सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी वकील सुनील पांडे यांची कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

न्यायदंडाधिकारी पुढे म्हणाले की, बँक ऑटोरिक्षा चालकाला इतके मोठे कर्ज कसे देऊ शकते हे समजणे कठीण आहे. न्यायालयाने कोर्ट कमिशनरला 10 हजार रुपये शुल्क तसेच पोलिस संरक्षण देण्याचे आदेशही दिले आहेत.