Aurangabad or Sambhaji Nagar: औरंगाबाद की संभाजीनगर? महाविकासआघाडी सरकारमध्ये मतभेदाची शक्यता; नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध

या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारमध्ये काहीसा संघर्षही निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Love Aurangabad Vs Super Sambhajinagar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

औरंगाबाद की संभाजीनगर (Aurangabad or Sambhaji Nagar) हा मुद्दा येत्या काही काळात महाविकासआघाडी सरकारमध्ये चर्चेला येण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारमध्ये काहीसा संघर्षही निर्माण होण्याची चिन्हे आहेत. औरंगाबाद (Aurangabad ) की संभाजीनगर (Sambhaji Nagar) याबाबत अद्याप उघडेपणे आणि अधिकृतपणे कोणतीही घोषणा चर्चा झाली नसली तरी सरकारदरबारी याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे समजते. औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करण्यासाठी शिवसेना (Shiv Sena) अग्रही आहे. परंतू काँग्रेस (Congress ) पक्षाने या मुद्द्याला ठाम विरोध दर्शवला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने सावध भूमिका घेतली आहे.

औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयाने मंत्रालयाच्या सामन्या प्रशासन विभागास औरंगाबादचे संभाजीनगर करण्याबाबतचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्ताच्या अनुशंघाने प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी असा काही प्रस्ताव आल्याचे आपल्याला माहिती नाही. शहराचे नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध आहे. शहरांची नावं बदलून काहीही होत नाही. नाव बदलली तरी इतिहास कसा बदलणार? असा सवाल उपस्थित करत काँग्रेस अशा निर्णयांचा विरोध करेन असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Love Aurangabad Vs Super Sambhajinagar: लव्ह औरंगाबाद विरुद्ध सुपर संभाजीनगर, शहराच्या ब्रँडिंगरुन राजकारण तापले)

दुसऱ्या बाजूला औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या नामांतराबाबत सावध भूमिका व्यक्त केली आहे. औरंगाबादचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे की, महापालिकेने कोणत्याही प्रकारचे बोर्ड लावताना काळजी घ्यावी. शहरांची नावे बदलत असताना किंवा त्याबाबतचे बोर्ड लावत असतान जनहीत नजरेसमोर ठेवावे. शहरामध्ये रस्ते, पाणी, वीज यांसारखे इतरही अनेक मुद्दे जनतेसाठी महत्त्वाचे आहेत. महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

औरंगाबाद काँग्रेस नेते कल्याण काळे यांनी म्हटले आहे की, संभजी महाराजांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. छत्रपती संभाजीमहाराज, शिवाजी महाराज यांच्याबद्दल आम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही, असेही कल्याण काळे यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सरकार जर औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करत असेल तर त्याचे आम्ही स्वागत करतो. खरे म्हणजे हा निर्णय 1995 मध्येच झाला होता. परंतू, काही लोक मांजर अडवे गेल्याप्रमाणे अडवे गेले आणि हा निर्णय रद्द करावा लागला. त्यामुळे आता सरकार जर हा निर्णय घेत असेल तर त्याचे आम्ही स्वागत करतो, असेही अंबादास दानवे यांनी म



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif