एमआयएम खासदार इम्तियाज जलील अडचणीत येणार, सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका हायकोर्टात दाखल

तर जलील यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबईतील उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

इम्तियाज जलील (फोटो सौजन्य-फेसबुक)

औरंगाबाद (Aurangabad)  येथील एमआयएम (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर जलील यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबईतील उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. त्याचसोबत जलील यांनी धर्माच्या नावाखाली मत मागितल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच निवडणूकीतून अपात्रसुद्धा ठरवावे असे सुद्धा त्यामध्ये म्हटले आहे.

जलील यांनी प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची नोंद लपवणे, खर्च किती झाला याबद्दल माहिती लपवणे यासारख्या कारणावरुन याचिका दाखल करण्यात आली आहे. शेख नदीम शेख करीम या पराभूत झालेल्या उमेदवाराने जलील यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकेसोबत धर्माच्या नावावर मत मागितल्याची सीडी आणि अन्य पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

(नितेश राणे यांच्यावर 'खुनाचा प्रयत्न' हे कलम लावण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आदेश; नारायण राणे मुलाला वाचवण्यात अपयशी)

तर जलील यांच्यावरील आरोप खरे ठरल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होईल आणि निवडणूक लढवण्यासाठी त्यांना अपात्र ठरविले जाईल असे याचिकाकर्त्यांच्या वकिलाने स्पष्ट केले आहे. तसेच जलील यांना निवडणूक खर्चाबाबत आयोगाने नोटीस धाडली आहे.