औरंगाबाद: ऐतिहासिक वास्तू 'बिबी का मकबरा' ची पडझड, पुरातत्व विभागाच्या कामगिरीवर शंका उपस्थितीत
त्यामुळे आता पुरातत्व विभागाच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली जात आहे
औरंगाबाद (Aurangabad) मधील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बिबी का मकबराची' (Bibi Ka Maqbara) पडझड होत आहे. त्यामुळे आता पुरातत्व विभागाच्या (Archeology Department) कामगिरीवर शंका उपस्थित केली जात आहे. तसेच ऐतिहासिक वास्तूचा ठेवा कायम ठेवण्यासाठी त्याची सुरक्षा करणे महत्वाचे आहे. परंतु पडझडीच्या कारणामुळे बिबी का मकबराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच जगातील सात आश्चर्यांपैकी एक अशा ताज महालाची स्थिती सुद्धा वाईट झाली असून तो पिवळसर दिसू लागला आहे.
बिबी का मकबरा सध्या काळवंडलेला दिसून येत आहे. त्याचसोबत खपली निघालेले मिनार, नक्षीकाम पुसट झाले असून या ऐतिहासिक वास्तूची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूची योग्य जपणूक करण्याचे काम पुरातत्व विभागाचे आहे. मात्र त्यांच्याकडून याबद्दल दुर्लक्ष केले जात असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.
(दादर मधील चैत्यभुमीवर अखंड भीमज्योत लवकरच उभारणार, राज्य सरकारने दिली मान्यता)
दख्खनी ताजमहल म्हणून सुद्धा बिबी का मकबराची ओळख आहे. तर 1679 मध्ये औरंगजेबाचा मुलगा आजम शहाने त्याच्या आईच्या स्मरणार्थ ही ऐतिहासिक वास्तू उभारली. तर औरंगाबादचे बोधचिन्ह म्हणून 'बिबी का मकबरा' हा शहरातील अनेक पुरातन वास्तूंपैकी एक आहे.